ETV Bharat / bharat

'भारत आमचा अत्यंत निकटचा मित्र', मादागास्करचे संरक्षण मंत्री रोकोटोनिरिया रिचर्ड यांचे मत

'ईटीव्ही भारत'शी केलेल्या चर्चेमध्ये, लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी भारताला निकटचा मित्र म्हटले आहे. तत्पूर्वी त्यांनी भारताचे समपदस्थ राजनाथ सिंह यांच्याशी अधिकृत बोलणी केली. लखनऊ येथे आयोजित संरक्षण खात्याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आले असताना, त्यांची ही भेट झाली. पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर असलेल्या बेटवजा देशाला हिंदी महासागरातील आपल्या 'ऑपरेशन व्हॅनिला'च्या माध्यमातून भारतीय नौदलाने गेल्या काही आठवड्यांमध्ये चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या मालागासी देशाला सर्व प्रकारचे सहाय्य दिले होते.

India a great friend says Madagascar Defense Minister
'भारत आमचा अत्यंत निकटचा मित्र', मादागास्करचे संरक्षण मंत्री रोकोटोनिरिया रिचर्ड यांचे मत
author img

By

Published : Feb 10, 2020, 6:11 PM IST

'डायन' या चक्रीवादळाने उदध्वस्त झालेला मादागास्कर हा छोटासा बेटवजा देश आपत्तीकाळात भारताने वेळेवर आणि भरपूर मदत दिल्याने भारताप्रती कृतज्ञ आहे. मादागास्करचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल रोकोटोनिरिया रिचर्ड यांनी भारत हा आमचा अत्यंत निकटचा मित्र आहे, असे म्हटले आहे. 'ईटीव्ही भारत'शी केलेल्या चर्चेमध्ये, लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी भारताला निकटचा मित्र म्हटले आहे. तत्पूर्वी त्यांनी भारताचे समपदस्थ राजनाथ सिंह यांच्याशी अधिकृत बोलणी केली. लखनऊ येथे आयोजित संरक्षण खात्याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आले असताना, त्यांची ही भेट झाली.

पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर असलेल्या बेटवजा देशाला हिंदी महासागरातील आपल्या 'ऑपरेशन व्हॅनिला'च्या माध्यमातून भारतीय नौदलाने गेल्या काही आठवड्यांमध्ये चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या मालागासी देशाला सर्व प्रकारचे सहाय्य दिले. 'आयएनएस ऐरावत'ला ताबडतोब मदत कार्य करण्यासाठी वळवण्यात आले आणि स्थानिकांसाठी वैद्यकीय शिबिरे उभारली गेली. लखनऊमध्ये गेल्या आठवड्यात संरक्षण प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राजनाथ सिंग आणि रिचर्ड यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान प्रदेशात सागरी सुरक्षेबाबत सहकार्य वाढवण्याचा प्रमुख मुद्दा होता. व्यापार आणि वाणिज्य यांची भरभराट होण्यासाठी सागरी शेजारी म्हणून दोन्ही देशांवर सुरक्षित सागरी वातावरण राहिल, याची खात्री करण्याची जबाबदारी आहे, यावर राजनाथ यांनी जोर दिला.

लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी त्याबदल्यात हिंदी महासागरातील सागरी प्रदेशात सुरक्षेचे जतन करण्यात भारताकडे अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे, यावर जोर दिला. मादागास्करचे अध्यक्ष राजोएलिना यांनी भारताने दिलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल भारताचे आभार मानणारे ट्विट केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी असे लिहिले होते की, हिंदी महासागराद्वारे मादागास्करला जोडल्या गेल्याने, भारत हा मादागास्करच्या सुखदुःखात त्याच्या पाठिशी उभा राहण्यास कटिबद्ध आहे. प्रदेशातील सर्वांच्या सुरक्षा आणि विकासासाठी तुमच्याबरोबर काम करण्याकडे मी पहात आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.

हिंदी महासागरातील पाश्चिमात्य प्रदेशात चीन 'जिबौती' या लष्करी तळाच्या माध्यमातून आपला पाया भक्कम करत आहे. यामुळे भारताने आपल्या आफ्रिकन भागीदार देशांशी डावपेचात्मक सहकार्य वाढवले आहे. या धोरणानुसार ६ फेब्रुवारी २०२० रोजी लखनऊ येथे संरक्षण खात्याच्या अकराव्या द्वैवार्षिक प्रदर्शनाच्या दरम्यान भारत आणि आफ्रिकन संरक्षण मंत्र्यांची पहिलीवहिली बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून भारताने नायजेरिया, इथिओपिया आणि टांझानिया या देशांमध्ये संरक्षण अकादमी आणि महाविद्यालये स्थापन केली आहेत. बोट्सवाना, नामिबिया, युगांडा, लेसोथो, झांबिया, मॉरिशस, सेशेल्स अशा अनेक आफ्रिकन देशांमध्ये प्रशिक्षण पथके तैनात केली आहेत. तेथे जहाजांच्या सदिच्छा भेटी तसेच संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर जे संयुक्त निवेदन काढण्यात आले, त्यात असे म्हटले आहे की, २०१९ मध्ये मोझांबिकमध्ये 'इदाई' चक्रीवादळादरम्यान भारतीय संरक्षण दलाने केलेल्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती पुनर्वसन कार्यात केलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. तसेच २०१८ मध्ये जिबौतीमधून अशाच वेगवेगळ्या कारवायांच्या माध्यमातून मादागास्करसह ४१ देशांच्या अडकलेल्या नागरिकांची सुटका भारताने केली, त्याचेही त्यांनी कौतुक केले. दहशतवाद आणि अतिरेकीवाद, चाचेगिरी, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांची तस्करी यासह संघटित गुन्हेगारीच्या सामायिक आव्हानांना ओळखून संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत अधिक संरक्षण सहकार्याचे आवाहन केले. संरक्षण उद्योगाच्या क्षेत्रात गुंतवणूक, संरक्षण उपकरण सॉफ्टवेअरमध्ये संयुक्त उद्योग, डिजिटल संरक्षण, संशोधन आणि विकास, संरक्षण उपकरणांची तरतूद, सुटे भाग आणि शाश्वत आणि परस्परांना लाभप्रद होईल अशा अटींवर देखभाल यात अधिक सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन करत आहोत, असे या औपचारिक निवेदनात म्हटले आहे.

वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी चर्चा करताना रिचर्ड यांनी उभरत्या अर्थव्यवस्थांच्या संरक्षण क्षमतांमध्ये परिवर्तन घडवण्यात भारत सहाय्य करू शकतो, ही गोष्ट त्यानी अधोरेखित केली. मादागास्करने येत्या २६ जून रोजी त्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभास हजर राहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आमंत्रण दिले आहे. स्मिता शर्मा यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा काही भाग...

प्रश्न : मादागास्करमध्ये नुकत्याच घडलेल्या चक्रीवादळाने नक्की किती नुकसान झाले, याची जरा माहिती द्या.

लेफ्ट. जन. रिचर्ड : गेल्या संततधार पावसाने अनेक भागांत पूर आले तसेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अधिकृतपणे, मादागास्करमध्ये २१ जण मृत झाले आणि २० जण बेपत्ता झाले. तसेच, ८० हजार लोक बेघर झाले.

प्रश्न : पहिला प्रतिसाद देणारा देश म्हणून भारताची मदत कितपत महत्वाची आहे? नवी दिल्लीक़डून तुमच्या यापुढील अपेक्षा काय आहेत?

लेफ्ट. जन. रिचर्ड : भारत सरकारने केलेली मदत खरोखरच महत्वपूर्ण राहिली आहे. त्याशिवाय ५ टन अन्नधान्य आणि वैद्यकीय औषधे आणल्याने आरोग्यसेवाही पुरवण्यात आली. संकटकाळात मालागासी लोकांना अत्यंत थोड्या कालावधीत भारताने मदत केल्याने मादागास्कर भारताला अत्यंत निकटचा मित्र मानतो. प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या माध्यमातून भारत सरकारचे आभार मानले आहेत.

प्रश्न : हिंदी महासागरात निव्वळ सुरक्षा पुरवणारा देश म्हणून भारताकडे स्पष्ट क्षमता आहे का?

लेफ्ट. जन. रिचर्ड : भारत हा त्याच्या कौशल्य आणि जगभरातील लौकिकासाठी ओळखला जाणारा मोठा देश आहे. भारताने संरक्षण प्रदर्शनातून जगातील इतर देशांना आकर्षून घेण्याची ताकद दाखवून दिली आहे. शिवाय, भारताच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या आफ्रिकन देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत आफ्रिकन देशांनी भारतीय संगणक उद्योगात वाढते स्वारस्य दाखवले. शिवाय, भारताने केलेली प्रगती आणि तांत्रिक पराक्रम यामुळे त्याच्याशी सहकार्य मजबूत करण्याची इच्छा उदयास आली आहे.

प्रश्न : लखनऊ येथील संरक्षण प्रदर्शनातून तुम्हाला काय घेऊन जाण्याची आशा आहे? तुमचा अनुभव काय आहे?

लेफ्ट. जन. रिचर्ड : संरक्षण प्रदर्शन हे देशाच्या इतिहासातील कोणत्याही प्रमुख घटनांच्या वर असते कारण ते भरवणाऱ्या देशाच्या पुढे जाण्याच्या क्षमतेचे ते प्रदर्शन करत असतात. संरक्षण डिजिटलायझेशनच्या संदर्भात भारताची कामगिरी उभरत्या देशांच्या संरक्षणात परिवर्तन घडवण्यासाठीचा भविष्यातील मार्ग खुला करते. लष्करी व्यवहारातील क्रांति ही काही मायावी कल्पना आता राहिलेली नाही. अचानक, सीमेवरील नियंत्रण किंवा विरोधी सशस्त्र दलांचे हल्ले असे सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी खालच्या पातळीवरसुद्धा डिजिटलायझेशनमध्ये वाढता रस दाखवला जात आहे.

प्रश्न : भारत आणि मादागास्कर यांच्यात कोणत्या प्रकारचे लष्करी आणि सुरक्षा सहकार्य याबाबत आपले पूर्वानुमान काय आहे?

लेफ्ट. जन. रिचर्ड : लखनऊ येथील संरक्षण प्रदर्शनाच्या अनुषंगाने, भारत आणि मादागास्करसह आफ्रिकन देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली. भारत-आफ्रिका सहकार्याच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय सुरक्षा सुधारणे हे नेहमी उद्दिष्ट असते. या सर्वापेक्षा वर, भारत आणि आफ्रिका यांच्यात जवळचे संबंध आहेत, हे आपण विसरता कामा नये. त्यासाठी महात्मा गांधी यांचा दाखला देता येईल, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत अभ्यास केला. सध्याचे पंतप्रधान यांचे झिम्बाब्वेशी संबंध आहेत. भारताने अलिप्त राष्ट्रांची कल्पना प्रथम मांडली असून या सर्वामुळे आम्हाला भारताशी संबंध मजबूत करण्याकडे नेत आहेत. ज्या महासागरात मादागास्कर स्थित आहे, त्याचे नाव भारतीय (हिंदी) आहे. आणि यामुळेच दोन देशांत सहकार्य मजबूत करण्यासाठी शिष्टमंडळ परिषदेला उपस्थित राहिले.

- स्मिता शर्मा, नवी दिल्ली.

Intro:Body:

भारत आमचा अत्यंत निकटचा मित्र

मादागास्करचे संरक्षण मंत्री रोकोटोनिरिया रिचर्ड यांचे मत 

'डायन' या चक्रीवादळाने उध्वस्त झालेला मादागास्कर हा छोटासा बेटवजा देश आपत्तीकाळात भारताने वेळेवर आणि भरपूर मदत दिल्याने भारताप्रती कृतज्ञ आहे. मादागास्करचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल रोकोटोनिरिया रिचर्ड यांनी भारत हा आमचा अत्यंत निकटचा मित्र आहे, असे म्हटले आहे. 'ईटीव्ही भारत'शी केलेल्या चर्चेमध्ये, लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी भारताला निकटचा मित्र म्हटले आहे. तत्पूर्वी त्यांनी भारताचे समपदस्थ राजनाथ सिंह यांच्याशी अधिकृत बोलणी केली. लखनऊ येथे आयोजित संरक्षण खात्याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आले असताना, त्यांची ही भेट झाली.

पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर असलेल्या बेटवजा देशाला हिंदी महासागरातील आपल्या 'ऑपरेशन व्हॅनिला'च्या माध्यमातून भारतीय नौदलाने गेल्या काही आठवड्यांमध्ये चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या मालागासी देशाला सर्व प्रकारचे सहाय्य दिले. 'आयएनएस ऐरावत'ला ताबडतोब मदत कार्य करण्यासाठी वळवण्यात आले आणि स्थानिकांसाठी वैद्यकीय शिबिरे उभारली गेली. लखनऊमध्ये गेल्या आठवड्यात संरक्षण प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राजनाथ सिंग आणि रिचर्ड यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान प्रदेशात सागरी सुरक्षेबाबत सहकार्य वाढवण्याचा प्रमुख मुद्दा होता. व्यापार आणि वाणिज्य यांची भरभराट होण्यासाठी सागरी शेजारी म्हणून दोन्ही देशांवर सुरक्षित सागरी वातावरण राहिल, याची खात्री करण्याची जबाबदारी आहे, यावर राजनाथ यांनी जोर दिला.

लेफ्टनंट जनरल रिचर्ड यांनी त्याबदल्यात हिंदी महासागरातील सागरी प्रदेशात सुरक्षेचे जतन करण्यात भारताकडे अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे, यावर जोर दिला. मादागास्करचे अध्यक्ष राजोएलिना यांनी भारताने दिलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल भारताचे आभार मानणारे ट्विट केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी असे लिहिले होते की, हिंदी महासागराद्वारे मादागास्करला जोडल्या गेल्याने, भारत हा मादागास्करच्या सुखदुःखात त्याच्या पाठिशी उभा राहण्यास कटिबद्ध आहे. प्रदेशातील सर्वांच्या सुरक्षा आणि विकासासाठी तुमच्याबरोबर काम करण्याकडे मी पहात आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.

हिंदी महासागरातील पाश्चिमात्य प्रदेशात चीन 'जिबौती' या लष्करी तळाच्या माध्यमातून आपला पाया भक्कम करत आहे. यामुळे भारताने आपल्या आफ्रिकन भागीदार देशांशी डावपेचात्मक सहकार्य वाढवले आहे. या धोरणानुसार ६ फेब्रुवारी २०२० रोजी लखनऊ येथे संरक्षण खात्याच्या अकराव्या द्वैवार्षिक प्रदर्शनाच्या दरम्यान भारत आणि आफ्रिकन संरक्षण मंत्र्यांची पहिलीवहिली बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून भारताने नायजेरिया, इथिओपिया आणि टांझानिया या देशांमध्ये संरक्षण अकादमी आणि महाविद्यालये स्थापन केली आहेत. बोट्सवाना, नामिबिया, युगांडा, लेसोथो, झांबिया, मॉरिशस, सेशेल्स अशा अनेक आफ्रिकन देशांमध्ये प्रशिक्षण पथके तैनात केली आहेत. तेथे जहाजांच्या सदिच्छा भेटी तसेच संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर जे संयुक्त निवेदन काढण्यात आले, त्यात असे म्हटले आहे की, २०१९ मध्ये मोझांबिकमध्ये 'इदाई' चक्रीवादळादरम्यान भारतीय संरक्षण दलाने केलेल्या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती पुनर्वसन कार्यात केलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. तसेच २०१८ मध्ये जिबौतीमधून अशाच वेगवेगळ्या कारवायांच्या माध्यमातून मादागास्करसह ४१ देशांच्या अडकलेल्या नागरिकांची सुटका भारताने केली, त्याचेही त्यांनी कौतुक केले. दहशतवाद आणि अतिरेकीवाद, चाचेगिरी, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांची तस्करी यासह संघटित गुन्हेगारीच्या सामायिक आव्हानांना ओळखून संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत अधिक संरक्षण सहकार्याचे आवाहन केले. संरक्षण उद्योगाच्या क्षेत्रात गुंतवणूक, संरक्षण उपकरण सॉफ्टवेअरमध्ये संयुक्त उद्योग, डिजिटल संरक्षण, संशोधन आणि विकास, संरक्षण उपकरणांची तरतूद, सुटे भाग आणि शाश्वत आणि परस्परांना लाभप्रद होईल अशा अटींवर देखभाल यात अधिक सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन करत आहोत, असे या औपचारिक निवेदनात म्हटले आहे.

वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी चर्चा करताना रिचर्ड यांनी उभरत्या अर्थव्यवस्थांच्या संरक्षण क्षमतांमध्ये परिवर्तन घडवण्यात भारत सहाय्य करू शकतो, ही गोष्ट त्यानी अधोरेखित केली. मादागास्करने येत्या २६ जून रोजी त्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभास हजर राहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आमंत्रण दिले आहे. स्मिता शर्मा यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा काही भाग...

प्रश्न : मादागास्करमध्ये नुकत्याच घडलेल्या चक्रीवादळाने नक्की किती नुकसान झाले, याची जरा माहिती द्या.

लेफ्ट. जन. रिचर्ड : गेल्या संततधार पावसाने अनेक भागांत पूर आले तसेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अधिकृतपणे, मादागास्करमध्ये २१ जण मृत झाले आणि २० जण बेपत्ता झाले. तसेच, ८० हजार लोक बेघर झाले.

प्रश्न : पहिला प्रतिसाद देणारा देश म्हणून भारताची मदत कितपत महत्वाची आहे? नवी दिल्लीक़डून तुमच्या यापुढील अपेक्षा काय आहेत?

लेफ्ट. जन. रिचर्ड : भारत सरकारने केलेली मदत खरोखरच महत्वपूर्ण राहिली आहे. त्याशिवाय ५ टन अन्नधान्य आणि वैद्यकीय औषधे आणल्याने आरोग्यसेवाही पुरवण्यात आली. संकटकाळात मालागासी लोकांना अत्यंत थोड्या कालावधीत भारताने मदत केल्याने मादागास्कर भारताला अत्यंत निकटचा मित्र मानतो. प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या माध्यमातून भारत सरकारचे आभार मानले आहेत.

प्रश्न : हिंदी महासागरात निव्वळ सुरक्षा पुरवणारा देश म्हणून भारताकडे स्पष्ट क्षमता आहे का?

लेफ्ट. जन. रिचर्ड : भारत हा त्याच्या कौशल्य आणि जगभरातील लौकिकासाठी ओळखला जाणारा मोठा देश आहे. भारताने संरक्षण प्रदर्शनातून जगातील इतर देशांना आकर्षून घेण्याची ताकद दाखवून दिली आहे. शिवाय, भारताच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत झालेल्या आफ्रिकन देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत आफ्रिकन देशांनी भारतीय संगणक उद्योगात वाढते स्वारस्य दाखवले. शिवाय, भारताने केलेली प्रगती आणि तांत्रिक पराक्रम यामुळे त्याच्याशी सहकार्य मजबूत करण्याची इच्छा उदयास आली आहे. 

प्रश्न : लखनऊ येथील संरक्षण प्रदर्शनातून तुम्हाला काय घेऊन जाण्याची आशा आहे? तुमचा अनुभव काय आहे?

लेफ्ट. जन. रिचर्ड : संरक्षण प्रदर्शन हे देशाच्या इतिहासातील कोणत्याही प्रमुख घटनांच्या वर असते कारण ते भरवणाऱ्या देशाच्या पुढे जाण्याच्या क्षमतेचे ते प्रदर्शन करत असतात. संरक्षण डिजिटलायझेशनच्या संदर्भात भारताची कामगिरी उभरत्या देशांच्या संरक्षणात परिवर्तन घडवण्यासाठीचा भविष्यातील मार्ग खुला करते. लष्करी व्यवहारातील क्रांति ही काही मायावी कल्पना आता राहिलेली नाही. अचानक, सीमेवरील नियंत्रण किंवा विरोधी सशस्त्र दलांचे हल्ले असे सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी खालच्या पातळीवरसुद्धा डिजिटलायझेशनमध्ये वाढता रस दाखवला जात आहे.

प्रश्न : भारत आणि मादागास्कर यांच्यात कोणत्या प्रकारचे लष्करी आणि सुरक्षा सहकार्य याबाबत आपले पूर्वानुमान काय आहे?

लेफ्ट. जन. रिचर्ड : लखनऊ येथील संरक्षण प्रदर्शनाच्या अनुषंगाने, भारत आणि मादागास्करसह आफ्रिकन देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली. भारत-आफ्रिका सहकार्याच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय सुरक्षा सुधारणे हे नेहमी उद्दिष्ट असते. या सर्वापेक्षा वर, भारत आणि आफ्रिका यांच्यात जवळचे संबंध आहेत, हे आपण विसरता कामा नये. त्यासाठी महात्मा गांधी यांचा दाखला देता येईल, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत अभ्यास केला. सध्याचे पंतप्रधान यांचे झिम्बाब्वेशी संबंध आहेत. भारताने अलिप्त राष्ट्रांची कल्पना प्रथम मांडली असून या सर्वामुळे आम्हाला भारताशी संबंध मजबूत करण्याकडे नेत आहेत. ज्या महासागरात मादागास्कर स्थित आहे, त्याचे नाव भारतीय (हिंदी) आहे. आणि यामुळेच दोन देशांत सहकार्य मजबूत करण्यासाठी शिष्टमंडळ परिषदेला उपस्थित राहिले.

- स्मिता शर्मा, नवी दिल्ली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.