नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी प्राप्तिकर विभागाचे छापे कायद्यानुसारच सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यात राजकीय वैराचा भाग नाही असेही त्यांनी एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
'लहान मुले, गर्भवती मातांसारख्या समाजातील कमकुवत वर्गांसाठी असलेल्या विविध योजनांमधून आडमार्गाने पैशांचा अपहार केला जात आहे. असे करणाऱ्यांविरोधात प्राप्तिकराच्या छाप्यांमुळे भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले आहेत,' असे मोदी म्हणाले.
'विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या कर्जबुडव्यांबद्दल प्रश्न विचारला असता, मोदींनी त्यांना सर्व कर्ज परत करावे लागले, असे म्हटले आहे. त्यांना याची जाणीव झाल्यानंतरच ते व्यवस्थेचा फायदा उचलून पळून गेले,' असे त्यांनी म्हटले आहे.
२०१९ मध्ये त्यांना तुरुंगाची पायरी चढावी लागेल. २०१९ नंतर ते तुरुंगातच असतील, असे मोदी म्हणाले. 'टीका करणारे लोक त्यांच्यापैकी काही प्रत्यर्पणाचे खटले हरले आहेत. तर काही तुरुंगात येऊन पडले आहे, त्यांच्याबद्दल का बोलत नाहीत?' असा प्रश्न मोदींनी विचारला. 'भाजप मोठ्या आकड्यांनी विजय मिळवून सत्तेत येईल. तसेच, रालोआतील इतर पक्षही अधिक मते मिळवतील. या वेळी आम्ही पूर्ण बहुमतात येऊ,' असे मोदींनी म्हटले आहे.