भोपाळ - मध्य प्रदेशात 28 डिसेंबरपासून हिवाळी विधानसभेचे अधिवेशन होणार की नाही याचा निर्णय आज घेण्यात येईल. यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली होती. दरम्यान, अधिवेशनापुर्वी विधानसभेचे पाच आमदार कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी मध्य प्रदेशात 50 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता विधानसभेचे पाच आमदारांना कोरोना संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन संकटात आले आहे. विधानसभेची सर्वपक्षीय बैठकदेखील प्रस्तावित आहे. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह-
मध्य प्रदेश विधानसभेत 50 कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. यामध्ये शुक्रवारी चौकशी अहवालात 34 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर शनिवारी तपास अहवालात 16 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. अशा प्रकारे, कोरोना पॉझिटिव्ह असनाऱ्या कर्मचार्यांची संख्या 50 वर पोहोचली आहे. मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आणि विधानसभेचे प्रधान सचिव यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही त्यांची कोरोना तपासणी केली आहे.
पाच आमदारांनाही झाली कोरोनाची लागण-
मध्य प्रदेश विधानसभेच्या कर्मचार्यांव्यतिरिक्त पाच आमदारही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, मालिनी गौर, सुनीता पटेल, योगेंद्रसिंग बाबा, लखन सिंग आणि सिद्धार्थ कुशवाह व मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार आणि विधिमंडळ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल अद्याप आलेला नाही.
तीन दिवसांच्या अधिवेशनावर कोरोनाचे सावट-
कर्मचार्यांचा कोरोना तपासणीनंतर 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र अधिवेशन न घेण्यासाठी कोरोनाची जाणीवपूर्वक सहारा घेतला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. विधानसभेच्या अधिवेशनासाठी होणारी सर्वपक्षीय बैठक प्रस्तावित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनाचा कालावधी आता तीन दिवसांवरून एक दिवस कमी करता येऊ शकतो. तसेच सभापती व उपसभापती यांची निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते.
हेही वाचा- सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
हेही वाचा- पोलिसांनी रोखली भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या विरोधातील स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा