ETV Bharat / bharat

मेक इन इंडियांतर्गत बनवल्या पहिल्या स्वदेशी स्नायपर रायफल - मेक इन इंडिया

'एसएसएस डिफेन्स' असे या कंपनीचे नाव आहे. भारताला लवकरच युद्धोपयोगी वस्तू व हत्यारे बनवणारे तसेच निर्यात करणारे हब बनविण्याचा या कंपनीचा उद्देश आहे. या दोन्ही स्नायपर रायफल या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश आर. मचानी यांनी दिली.

Indigenous Sniper Rifles
author img

By

Published : Oct 14, 2019, 4:42 PM IST

बंगळुरू - केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत स्वदेशी बनावटीची अस्त्रे बनवण्याच्या दृष्टीने बंगळुरुच्या एका कंपनीने पाऊल उचलले आहे. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्नायपर रायफल्सचे नमुने तयार करण्यात या कंपनीला यश मिळाले आहे. भारतीय लष्कराकडून या बंदुका वापरल्या जातील.

'एसएसएस डिफेन्स' असे या कंपनीचे नाव आहे. भारताला लवकरच युद्धोपयोगी वस्तू व हत्यारे बनवणारे तसेच निर्यात करणारे हब बनविण्याचा या कंपनीचा उद्देश आहे.

संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया' आल्यानंतरच आम्ही या बंदुकांची निर्मिती सुरू केली होती. भारतात शस्त्रे बनविण्याचा परवाना असलेल्या काही कंपन्यांपैकी आम्ही एक आहोत. या दोन्ही स्नायपर रायफल या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत, अशी माहिती 'एसएसएस डिफेन्स'चे व्यवस्थापकीय संचालक सतीश आर. मचानी यांनी दिली.

संरक्षण विभागाला वेगवेगळ्या यंत्रांचे सुटे भाग पुरवण्याचे कामदेखील आम्ही करत आहोत. शस्त्रास्त्रांच्या सुट्या भागापासून सर्व शस्त्रे पूर्णपणे भारतात तयार करण्याचे, तसेच भविष्यात ही शस्त्रे निर्यात देखील करण्याचे आमचे लक्ष्य आहे. साहजिकपणे जागतिक दर्जाची शस्त्रे तयार करण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल, मात्र आमचे संशोधन व विकास केंद्र त्यासाठी समर्थ आहे, असेही ते म्हणाले.

एसएसएस डिफेन्स कंपनी सध्या शस्त्रे बनवण्यासाठी कर्नाटकातील जिग्नी तालुक्याजवळ ८० हजार चौरस मीटरचा नवा कारखाना उभारत आहे.

हेही वाचा : तब्बल ७२ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू, इंटरनेट अद्याप नाही

Intro:Body:

In a first, two indigenous sniper rifles developed by Bengaluru-based firm

Indigeneous Sniper Rifles, SSS Defence, सतीश मचानी, एसएसएस डिफेन्स, मेक इन इंडिया, Make in India

बंगळुरूमधील कंपनीने बनवल्या पहिल्या स्वदेशी स्नायपर रायफल

'एसएसएस डिफेन्स' असे या कंपनीचे नाव आहे. भारताला लवकरच युद्धोपयोगी वस्तू व हत्यारे बनवणारे तसेच निर्यात करणारे हब बनविण्याचा या कंपनीचा उद्देश आहे. या दोन्ही स्नायपर रायफल या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश आर. मचानी यांनी दिली.

बंगळुरू - केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत स्वदेशी बनावटीची अस्त्रे बनवण्याच्या दृष्टीने बंगळुरुच्या एका कंपनीने पाऊल उचलले आहे. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्नायपर रायफल्सचे नमुने तयार करण्यात या कंपनीला यश मिळाले आहे. भारतीय लष्कराकडून या बंदुका वापरल्या जातील.

'एसएसएस डिफेन्स' असे या कंपनीचे नाव आहे. भारताला लवकरच युद्धोपयोगी वस्तू व हत्यारे बनवणारे तसेच निर्यात करणारे हब बनविण्याचा या कंपनीचा उद्देश आहे. 

संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया' आल्यानंतरच आम्ही या बंदुकांची निर्मिती सुरु केली होती. भारतात शस्त्रे बनविण्याचा परवाना असलेल्या काही कंपन्यांपैकी आम्ही एक आहोत. या दोन्ही स्नायपर रायफल या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत, अशी माहिती 'एसएसएस डिफेन्स'चे व्यवस्थापकीय संचालक सतीश आर. मचानी यांनी दिली.

संरक्षण विभागाला वेगवेगळ्या यंत्रांचे सुटे भाग पुरवण्याचे कामदेखील आम्ही करत आहोत. शस्त्रास्त्रांच्या सुट्या भागापासून सर्व शस्त्रे पूर्णपणे भारतात तयार करण्याचे, तसेच भविष्यात ही शस्त्रे निर्यात देखील करण्याचे आमचे लक्ष्य आहे. साहजिकपणे जागतिक दर्जाची शस्त्रे तयार करण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल, मात्र आमचे संशोधन व विकास केंद्र त्यासाठी समर्थ आहे, असेही ते म्हणाले. 

एसएसएस डिफेन्स कंपनी सध्या शस्त्रे बनवण्यासाठी कर्नाटकातील जिग्नी तालुक्याजवळ ८० हजार चौरस मीटरचा नवा कारखाना उभारत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.