ETV Bharat / bharat

इम्रान खान पाक लष्कराच्या हातची कठपुतली, माजी पत्नीचा आरोप

पाकिस्तानी सैन्याने सूचना केल्यानंतरच पुलवामावरील दहशतवादी हल्ल्याबाबत खान यांनी प्रतिक्रिया दिली, असा आरोपही रेहम यांनी केला.

रेहम & इम्रान
author img

By

Published : Feb 20, 2019, 5:28 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातची कळपुतली आहेत, अशी टीका खान यांची माजी पत्नी रेहम खान यांनी केली आहे. इम्रान यांनी पुलवामा हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर रेहम यांनी ही टीका केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले होते.

पाकिस्तानी सैन्याने सूचना केल्यानंतरच पुलवामावरील दहशतवादी हल्ल्याबाबत खान यांनी प्रतिक्रिया दिली, असा आरोपही रेहम यांनी केला. विचारसरणीसोबत तडजोड करून इम्रान सत्तेत आले आहेत, असेही रेहम म्हणाल्या.

भारत कुठल्याही पुराव्याविना पाकिस्तानवर दोषारोप करत आहे, असा आरोप इम्रान यांनी केला. ते एका पाकिस्तानी रेडिओवर बोलत होते. आमच्यापैकी कोणी हिंसा पसरवावी असा आमचा उद्देश नाही. मी भारत सरकारला हे सांगू इच्छितो की, जर कोण्या पाकिस्तानी व्यक्तिविरोधात काही पुरावे आढळले तर आम्हा त्यावर कडक कारवाई करू, असेही इम्रान यांनी सांगितले.

जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही त्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ. युद्धाची सुरुवात करणे हे मानवाच्या हातात असते. मात्र, युद्ध आपल्याला कुठे घेऊन जाईल, हे देवालाच माहिती, असेही खान म्हणाले.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.