ETV Bharat / bharat

सोमवारी IMAचा देशव्यापी संप; राज्यातीलही वैद्यकीय सेवेवरही होणार परिणाम - mamata banerjee

'डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची गरज आहे. कोलकाताच्या एनआरएस रुग्णालयात अत्यावश्यक विभागात सुरक्षा रक्षक होतेही. मात्र, त्यांनी डॉक्टरांवर हल्ला झाला असतानाही काहीच केले नाही. त्यांना डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वाची असल्याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे,' असे शर्मा म्हणाले.

डॉ. राजन शर्मा
author img

By

Published : Jun 16, 2019, 9:17 PM IST

Updated : Jun 16, 2019, 11:06 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या (सोमवार ता.१७) देशव्यापी बंदची हाक दिली आहे. डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी ही माहिती दिली.

'आम्हाला भारतीय दंड विधान आणि गुन्हेगारी दंड विधानामध्ये काही सुधारणा हव्या आहेत. जेणेकरून कोणीही डॉक्टर्स, रुग्णालयांवर हल्ला चढवू शकणार नाही. त्यांच्यावर कायद्यानुसारच कारवाई केली जाईल,' असे शर्मा यांनी सांगितले. त्यांनी पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप हे व्यवस्थेचे अपयश होते. 'केवळ पीडितांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भेट देणे आवश्यक होते. तेवढीच मागणी केली होती. ही फार मोठी बाब होती का? आणि तुम्ही भेट घेतली नाहीत, तर तुम्ही त्यांचा अपमान का करताय?' असा प्रश्न शर्मा यांनी केला.

'डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची गरज आहे. कोलकाताच्या एनआरएस रुग्णालयात अत्यावश्यक विभागात सुरक्षा रक्षक होतेही. मात्र, त्यांनी डॉक्टरांवर हल्ला झाला असतानाही काहीच केले नाही. त्यांना डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वाची असल्याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे,' असे शर्मा म्हणाले.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मृत्यूंविषयी बोलताना त्यांनी 'पायाभूत सुविधांचा आणि स्वच्छतेचा अभाव' या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे म्हटले.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी सर्व राज्यांना डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे कोणत्याही हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी विशेष कायदा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर रविवारी आयएमएने देशव्यापी संपाची घोषणा केली.

बंदमुळे राज्यात होणार गैरसोय

त्यानुसार, राज्यातही बंद पुकारला जाणार असल्याने उद्या (सोमवार) अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, कॅज्युअल्टी सेवा वगळता रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, सी. टी. स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर बंद राहतील. सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी ६ वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी या सुविधा बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

Intro:Body:

सोमवारी IMAचा देशव्यापी संप; राज्यातही वैद्यकीय सेवेवर परिणाम

Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.