धनूषकोडी (तामिळनाडू)- भारतीय नौदलाला धनूषकोडी येथील भारतीय जल सिमा हद्दीत सोन्याची अवैधरित्या वाहतूक करणारी नाव पकडण्यात यश आले आहे. ही कारवाई १५ फेब्रुवारीला करण्यात आली होती. नौदलाने ताब्यात घेतलेल्या नावेत मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहिती मिळाली आहे.
रमनाड येथे भारतीय नौदलाचा तळ आहे. येथून नौदलाच्या हेलिकॉप्टरने एक श्रीलंकन नाव पकडली होती. या नावेत ३.५ किलो अवैध सोन्याची वाहतूक होत होती. या नावेतील सोने नौदलाने जप्त केले असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा- नवी दिल्लीत पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये दोन गुन्हेगारांचा खात्मा