ETV Bharat / bharat

''मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर 'हे' लोक देश सोडतील'', बॉलिवूड अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर १० हजार श्रीमंत देश सोडतील...श्रीमंतांना देश सुरक्षित वाटत नाही...जाती धर्मावरुन भांडणाऱ्या देशात श्रीमंत कसे राहतील असे विधान कमाल खानने केले आहे. आगामी ५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे वादग्रस्त विधान केआरकेने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 2, 2019, 6:21 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्विट करुन बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खानने वादग्रस्त विधान केले आहे. एका रिपोर्ट हवाला देत केआरकेने म्हटलंय, की मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशातील दहा हजार कोट्याधिश देश सोडतील.

भारतीय अर्थव्यवस्था आणि निवणूका यांच्याबद्दल भाष्य करणारे तीन ट्विटट कमाल आर खानने केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्याने ग्लोबल वेल्थ मायग्रेशनचा हवाला देत म्हटलंय की, ५००० भारतीय कोट्याधिश २०१८ मध्ये दुबईत वास्तव्यास गेले. याकाळात ७००० रशियन आणि १५ हजार चीनी कोट्यधिश दुबईत शिफ्ट झाले. कमाल खान म्हणतो की, प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला दुबईसारख्या सुरक्षित स्वर्गात रहावे असे वाटते.

कमाल आर खानने लिहिलंय की, जर मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले तर २०१८ प्रमाणेच १० हजारहून अधिक कोट्याधिश २०१९ मध्ये राहायला जातील. प्रत्येक श्रीमंत व्यक्ती सुरक्षित वातावरणात राहणे पसंत करतो. जिथे लोक धर्म, जात पात, राज्य, नोकऱ्या आणि भाषा यासाठी भांडत असतील अशा देशात राहणे श्रीमंतांना कसे आवडेल.

पुढील ट्विटमध्ये केआरकेने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची चिंता व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुढील ५ वर्षात संकटात राहणार आहे. जर मोदीजी पंतप्रधान झाले तर डॉलर ९० रुपयापर्यंत पोहोचेल आणि गठबंधनाचे सरकार आले तर डॉलर १०० चा आकडा पार करेल. भारतात राहणाऱ्या श्रीमंतासाठी इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती आहे.

कमाल आर खानने 'देशद्रोही' हा चित्रपट बनवला होती. तो बिग बॉसमध्ये देखील झळकला होता. वादग्रस्त विधाने करण्यासाठी तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. विशेष म्हणजे तो स्वयंघोषीत चित्रपट समिक्षक आहे. भारतात मतदान करण्यासाठी तो परदेशातून आला होता. त्याने मतदान केल्याचा फोटोही शेअर केला होता. त्यावेळी त्याने बॉलिवूड सेलेब्रिटींनी मतादान केल्याच्या पोस्टवर कॉमेंट लिहिली होते की, हा चान्स अक्षय कुमारने मिस केलाय.

Intro:Body:

Ent 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.