ETV Bharat / bharat

१५ ऑगस्टला जाहीर होणार 'कोव्हॅक्सिन'च्या मानवी चाचणीचे अहवाल..

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस 'कोव्हॅक्सिन'च्या मानवी चाचण्यांचे अहवाल येणार आहेत.

ICMR-Bharat Biotech COVID-19 vaccine trial results to be released by Aug 15
देशातील पहिली कोरोनावरची लस
author img

By

Published : Jul 3, 2020, 10:10 AM IST

Updated : Jul 3, 2020, 5:10 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस 'कोव्हॅक्सिन'च्या मानवी चाचण्यांचे अहवाल येणार आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी भारत बायोटेक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे मुख्य तपासनीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनची चाचणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करा, ज्यामुळे या वैद्यकीय चाचणीचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत येऊ शकेल.

भारत बायोटेकला नुकताच कोव्हॅक्सिन या लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मिळाली होती. दरम्यान, पुढील महिन्यात याच्या चाचणीचा अहवाल जरी येणार असला, तरी वर्षाअखेरीपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

भारताने विकसित केलेली ही पहिली स्वदेशी लस आहे. सरकारचा हा सर्वोच्च प्राधान्य असलेला प्रकल्प असून या चाचणीच्या परीक्षणासाठी सर्वोच्च स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. एसएआरएस-सीओव्ही-2 (SARS-CoV-2) पासून ही लस आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने तयार केली आहे. पुणे (आयसीएमआर) आणि बीबीआयएल हे संयुक्तपणे या लसीच्या वैद्यकीय विकासासाठी काम करत आहेत, असेही पत्रात म्हटले आहे.

ICMR-Bharat Biotech COVID-19 vaccine trial results to be released by Aug 15
आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी लिहलेले पत्र.

सरकारच्या निरीक्षणात असलेला हा सर्वोच्च प्राथमिकता असलेला प्रकल्प आहे. यामुळे आयसीएमआरने एकूण 12 संस्थांना या लसीच्या वैद्यकीय चाचणी जलदगतीने करण्यासाठी सांगितले आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ने देशातील पहल्या स्वदेशी कोविड-19 लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी 12 संस्थांची निवड केली आहे. त्या संस्थांमध्ये आईएमएस एंड एसयूएम (ओडिशा), विशाखापट्टनम, रोहतक, नयी दिल्ली, पटना, बेळगाव (कर्नाटक), नागपूर, गोरखपूर, कट्टानकुलतूर (तमिलनाडू), हैदराबाद, आर्य नगर, कानपूर (उत्तर प्रदेश) आणि गोवा यांचा समावेश आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाखांवर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 19 हजार 148 रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : Jul 3, 2020, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.