ETV Bharat / bharat

मी भाजपमध्ये जाणार नाही..! सचिन पायलट यांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Jul 15, 2020, 9:52 AM IST

Updated : Jul 15, 2020, 11:13 AM IST

राजस्थानच्या सत्तासंघर्षात आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. पक्षाविरोधात नाराज असलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

achin Pilot
सचिन पायलट - संग्रहित

नवी दिल्ली - राजस्थानच्या सत्तासंघर्षात आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. पक्षाविरोधात नाराज असलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज त्यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुन्हा काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सचिन पायलट यांच्यावर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांवरून हटविण्यात आले.

पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली. सचिन पायलट यांच्यासह तीन मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले.

गेल्या वर्षात कर्नाटक, मध्यप्रदेश मधून काँग्रेसने सत्ता गमावल्यावर राजस्थानमध्ये काँग्रेस अडचणीत आली होती. सचिन पायलट यांनी बंड करत गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच त्यांच्या सोबत ३० आमदारांचा गट असल्याचा दावाही केला. त्यानंतर काँग्रेसकडून पायलट यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न झाला. तरीही पायलट यांनी काँग्रेसच्या बैठकीला येणार नसल्याचे स्पष्ट केले, त्यावर मंगळवारी काँग्रेसने सचिन पायलट यांना महत्वाच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. यासोबतच राजस्थान काँग्रेसने विश्वेद्र सिंघ आणि रमेश मिना या दोन मंत्र्यांनाही पायउतार करण्यात आले.

पायलट हे २०१८ मध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर गेहलोत यांची वर्णी लागल्यापासून नाराज होते. त्यानंतर राजस्थानात पायलट यांनी काँग्रेसचे सरकार अस्थिर केले. मात्र, गेहलोत यांनी यातूनही मार्ग काढून काँग्रेसची सत्ता मजबूत असल्याचे तूर्तास तरी सिद्ध केले आहे. पायलट यांच्या बंडखोरीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या, यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. मात्र त्यांची पुढील दिशा स्पष्ट नव्हती.

मंगळवारी काँग्रेसच्या बैठकीनंतर सचिन पायलट यांच्या समर्थकांनी भाजप प्रवेशाचा कोणता निर्णय नाही, मात्र राज्यात नेतृत्वात बदल गरजेचा असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे एका वृत्त वाहिनाला सांगितले आहे.

Last Updated : Jul 15, 2020, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.