हैदराबाद - बकरी ईदनिमित्त हैदराबाद येथील एका कुटुंबाने दिड लाख रुपये किमत असणाऱ्या 130 किलोच्या बकऱ्याची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कुटुंबाची दरवर्षी आरोग्यदायी आणि मोठ्या बकऱ्याची कुर्बानी देण्याची परंपरा आहे, असे मोहम्मद सरवार यांनी सांगितले.
आमच्या कुटुंबाची बकऱ्याची कुर्बानी देण्याची दशकाची परंपरा सुरू ठेवत आहोत. यावर्षी आम्ही 130 किलोच्या प्यारी नावाच्या बकऱ्याची कुर्बानी देणार आहोत, असे मोहम्मद यांनी सांगितले.
बकरी ईदच्या दिवशी आम्ही बकऱ्याची कुर्बानी देतो. आम्ही दिलेल्या कुर्बानीचा स्वीकार अल्लाह करेल आणि आपल्याला कोरोना विषाणूच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास मोहम्मद यांनी व्यक्त केला. यावर्षी बकरी ईद गुरुवारी सांयकाळी ते शुक्रवारी सांयकाळी यावेळेत साजरी केली जाणार आहे.