ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : तीन मानवी तस्करांना अटक, दोन महिलांची सुटका

author img

By

Published : Oct 16, 2020, 8:50 PM IST

संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) यमुना प्रसाद यांनी सांगितले की, या महिलांना विकण्याची चर्चा करताना या टोळीतील सदस्यांना बहजोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली. मोहम्मद शानू, विकास शर्मा आणि नजमा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उत्तर प्रदेश मानवी तस्करी न्यूज
उत्तर प्रदेश मानवी तस्करी न्यूज

संभल (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशामध्ये संभल पोलिसांनी मानवी तस्करांच्या एका टोळीचा भंडाफोड केला आणि दोन महिलांची सुटका केली. तसेच, तीन जणांना या वेळी अटक करण्यात आली.

संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) यमुना प्रसाद यांनी सांगितले की, या महिलांना विकण्याची चर्चा करताना या टोळीतील सदस्यांना बहजोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली. मोहम्मद शानू, विकास शर्मा आणि नजमा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - बिहार विधानसभा : स्वबळावर निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा - चिराग पासवान

ते म्हणाले की, ही टोळी महिलांना 50 हजार ते दोन लाख रुपयांना विकत असत. या टोळीने उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील बर्‍याच भागांत हातपाय पसरले होते. या टोळीकडून मुलींची छायाचित्रे, ऑडिओ आणि व्हिडिओ टेप जप्त करण्यात आल्या आहेत, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून राज्यातील इतर भागात कार्यरत असलेल्या टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती यमुना प्रसाद यांनी दिली.

हेही वाचा - 'अफगाणिस्तानने भारतापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.