हैदराबाद - 30 वर्षांपूर्वी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नॅशनल एरॉनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशने सर्वात मोठ्या दुर्बिणीची निर्मिती केली होती. या दुर्बिणीचे नाव 'हबल' असे आहे. ही दुर्बीण म्हणजे तंत्रज्ञानातील मोठी भरारीच. कारण तिच्यामुळे अंतराळातील अनेक गूढ उकलण्यास मदत झाली.
या दुर्बिणीला हबल हे नाव अमेरिकन अंतराळवीर एडवीन पी. हबल यांच्या नावावरून देण्यात आले होते. 20व्या शतकातील ते एक आघाडीचे अंतराळवीर होते. आपल्या आकाशगंगेच्या पलीकडे हजारो आकाशगंगा असल्याचा शोध त्यांनी 1920च्या दशकात लावला होता. त्यांच्या शोधामुळे अंतराळ समजण्यास मदत झाली.
हबल दुर्बिणीला लोकांची दुर्बीण असेही म्हणतात. कारण या दुर्बिणीतून मिळालेल्या छायाचित्रांमुळे अवकाश नागरिकांना पाहता आले. या दुर्बिणीची लांबी 43 .5 फूट असून ती एका स्कूल बस एवढी आहे. तर तिचे वजन 11 हजार 110 किलो ग्रॅम आहे. याची निर्मित नासा आणि युरोपीयन स्पेस एजन्सीने मिळून केली. 24 एप्रिल 1990 रोजी या दुर्बिणीचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
हबल दुर्बीण सौरउर्जेवर चार्ज होत असल्याचा दावा नासाने केला आहे. या दुर्बिणीवर 25 फुटाचे दोन सोलार पॅनल आहेत. त्यामुळे तिला 28 हजार प्रती तास या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास 97 मिनिटे लागतात.
आत्तापर्यंत या दुर्बिणीने अवकाशाची अप्रतिम दृष्य दाखवली आहेत. तारे, अवकाशगंगा, चंद्र यांच्याबाबत मानवाची समज त्यामुळे वाढली. प्लुटो ग्रहाजवळील चार चंद्रांचाही शोध या दुर्बिणीमुळे लागला.