लखनऊ - एक काळ असा होता, जेव्हा चंबळ फक्त गोळ्या आणि दरोडेखोरांच्या आवाजाने दबले गेले होते आणि मग, चंबळमध्ये एका अशा विचारसरणीचा उदय झाला, ज्यामुळे चंबळ शहरात केवळ शांतता पसरली नाही, तर शांततेच्या अस्तित्त्वाला तिथे खरा अर्थ मिळाला. या विचारसरणीने बदल्याच्या आगीला शांत केले, गोळ्यांचा आवाजही यापुढे दबला गेला आणि कालांतराने दरोडेखोरांमध्येही परिवर्तन घडून आले. आणि हे सर्व शक्य झाले होते, महात्मा गांधींमुळे. त्यांच्या शिकवणींपासून प्रेरित होऊन, कुख्यात अशा दरोडेखोरांनी देखील अहिंसेचा मार्ग पकडला .
चंबळ म्हणजेच हिंसा आणि हत्या, असे समीकरणच एके काळी झाले होते. तेव्हा एस. एन. सुब्बाराव, जयप्रकाश नारायण आणि रामचंद्र मिश्रा यांनी एक मोहीम राबवली. ज्याद्वारे, २ डिसेंबर १९७३ ला, एका सार्वजनिक कार्यक्रमात, कुख्यात अशा दरोडेखोरांनी शस्त्रत्याग करून आपल्या जगण्याचा मार्ग बदलला.
त्या दिवसानंतर, चंबळवर लागलेला 'धोकादायक शहर' हा डाग पुसला गेला.
हेही पहा : दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत...