ETV Bharat / bharat

निमलष्करी दलात तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत गृहमंत्रालयाने मागितल्या सूचना - निमलष्करी दल असिस्टंट कमांडंट भरती

निमलष्करी दलात 'असिस्टंट कमांडंट' पदावर तृतीयपंथीयांची भरती करण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे. त्यासाठी सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स यांच्या सूचना मागविण्यात येत आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 2, 2020, 8:00 PM IST

Updated : Jul 2, 2020, 8:35 PM IST

नवी दिल्ली - निमलष्करी दलात 'ट्रान्सजेंडर' म्हणजेच तृतीयपंथीयांची भरती करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय गंभीरपणे विचार करत असून विविध निमलष्करी दलांकडे सूचना मागविल्या आहेत. निमलष्करी दलात 'असिस्टंट कमांडंट' पदावर तृतीयपंथीयांची भरती करण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे.

गृहमंत्रालयाचे सचिव एस. मुथू कुमार यांनी सही केलेले एक पत्र विविध निमलष्करी दलांना पाठविण्यात आले आहे. सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स यांना 2020 साली होणाऱ्या असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीबाबत हे पत्र पाठविण्यात आले आहे. या भरतीमध्ये पुरुष, स्त्री या दोन लिंगाच्या रकान्यासह तृतीयंपथीयांची भरती करण्यासाठी तिसरा रकाना देण्याबाबत तुमच्या सूचना पाठवा, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर या मुद्द्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रत्येक निमलष्करी दलाकडून आलेल्या सूचना संबधित मानव संसाधन विभागाकडून संकलित करण्यात येतील. केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी 'स्टाफ सर्व्हीस कमिशन'कडून भरती आयोजित करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, यातील गॅझेटेड पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

समानतेचा मूलभूत हक्क सर्वांसाठी -

2014 साली सर्वोच्च न्यायालयाने पुरुष आणि स्त्रीसह तृतीयपंथीयांना अधिकृत ओळख दिली. राज्यघटनेत दिलेला समानतेचा मूलभूत अधिकार तृतीय पंथीयांनाही मिळायला पाहिजे, असे मत न्यायालयाने नोंदविले. केंद्रीय लष्करी दलामध्ये 7 हजार 859 असिस्टंट कमांडट कार्यरत आहेत.

Last Updated : Jul 2, 2020, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.