नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी 'निगेटिव्ह' आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुडगावमधील मेधांता या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. १२ दिवसानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
-
आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।
">आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।
कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती शाह यांनी ट्विटरवरून दिली. "आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो. या काळात ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, माझ्या कुटुंबियांचे धाडस वाढविले. त्या सर्वांचे मी आभार मानतो" असे ट्विट शाह यांनी केले आहे.
२ ऑगस्टला शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहीतीही त्यांनी ट्विटवरून दिली होती. 'कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली. यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. मी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान, या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे', असे आवाहनही शाह यांनी टि्वटद्वारे केले होते. मात्र, आता शाह कोरोनामुक्त झाले आहेत.