अयोध्या - विविध भाषा, विविध जाती आणि धर्म, त्यांची वेगवेगळी संस्कृतीने भारत देश नटलेला आहे. तरी सर्व भारतीय एकमेकांच्या धर्माचा आदर करत आपले जीवन व्यतीत करत असतात. त्याच प्रकराची घटना समोर आली आहे. लखनऊच्या हिंदू व्यक्तीने अयोध्यातील मुस्लीम बांधवांच्या होणाऱ्या मशिदीसाठी देणगी दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा देशात विविध धर्माचा व संस्कृतीचा आदर भारतीय करत असतात हे जगासमोर आले आहे.
लखनऊमधील रोहीत श्रीवास्तव या कायद्याच्या क्षेत्रात कामरणाऱ्यांनी अयोध्यात होणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या मशिदीसाठी रुपये २१ हजारांची देणगी दिली आहे. त्यांच्या या कृत्याने हिंदू-मुस्लीम भाईचारा वाढण्यासाठी मदत होणार असल्याची चर्चा आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले, की भारतात किती जाती-धर्म आहेत याला महत्व नसून ते सर्व गुण्या गोविंदाने राहातात याला महत्व आहे. तसेच भारतातील सर्व धर्म इतर धर्मांचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा आदर करण्यास शिकवते. त्यांनी या देणगीचा चेक इंडो-इस्लामिक कल्चर फौऊंडेशनच्या नावाने दिला आहे. ही ट्रस्ट सुन्नी वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.