ETV Bharat / bharat

सोसाट्याच्या वाऱ्याने काकरा- ताळगाव परिसरात मोठे नुकसान

बुधवार मध्यारात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पाऊस झाला. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता, की नारळाची झाडे तूटून पडली. तर काही घरांवर झाडे कोसळली.

काकरा- ताळगाव परिसरात मोठे नुकसान
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:10 PM IST

पणजी - शहरापासून जवळील जुआरी नदीच्या काठी असलेल्या काकरा गावाचे सोसा्टयाच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या या वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पुढील दोन ते तीन दिवस वादळाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार मध्यारात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पाऊस झाला. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता, की नारळाची झाडे तूटून पडली. तर काही घरांवर झाडे कोसळली. वाऱ्यामुळे एका झोपडीचा उडालेला पत्रा सुमारे ५० फुटांहून अधिक उंचीच्या झाडावर जाऊन अडकला.

काकरा- ताळगाव परिसरात मोठे नुकसान

पणजी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्याला सुरुवात केली आहे. जोरदार वाऱ्यामुळे पक्षांचाही मृत्यू झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर कावळे मृत अवस्थेत आढळून आले. झाडे उन्मळून पडल्यानेही पक्षांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी वादळ झाले नसून वेगाने वारे वाहत होते. याबाबत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. पुढील दोन तीन दिवस सोसाट्याचा वारा राहणार असून मुसळधार पावसाचीही शक्यता आहे, असे गोवा वेधशाळेचे संचालक कृष्णमूर्ती पडगलवार यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. संततधार पावसामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वेगवान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात लाटा उसळत आहेत.

दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मागील चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद सांगे येथे २१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर वाळपई येथे अद्यापपर्यंत पाऊस पडलेला नाही.

Intro:पणजी : पणजी शहरापासून जवळच जुआरी नदीच्या मुखावरील काठावर असलेल्या काकरा गावाला बुधवार मध्यरात्री जोरदार झालेल्या वाऱ्यापावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.

Body:मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळावारपासून जोरदार पडत आहे. संततधार पावसामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वेगवान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात लाटा उसळत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार मध्यारात्री दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वारापाऊस झाला. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, नारळाची झाडे तूटून पडली. तर काही घरांवर वडाचे झाड कोसळले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, तेथील एका झोपडीचा उडालेला पत्र सुमारे 50 फुटांहून अधिक उंचीच्या झाबाच्या शेंड्यावर जाऊन अडकला आहे.
या पावसामुळे जसे मानवी वस्तीचे नूकसान झाले आहे. तसेच पक्षांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही कावळे किनाऱ्यावर म्रूतावस्थेत आढळून आले. त्याबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, या भागात पक्षी जेथे मोठ्या प्रमाणात वस्ती करत तिच झाडे रात्रीच्या वाऱ्याने उन्मळून पडली आहेत.
पणजी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. क्रूष्णमूर्ती पडगलवार यांना वाऱ्याच्या स्थीती विषयी विचारले असता ते म्हणाले की, बुधवारी वादळ झालेले नाही. मात्र, वेगवान वारे वाहत होते. तसा इशाराही देण्यात आला होता. तसेच पुढील दोन तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
दरम्यान, आजसकाळी साडेआठ वाजता मागील चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद सांगे येथे 218 मिलीमीटर पालसाची नोंद झाली. तर वाळपई मध्ये काहीच पाऊस झालेला नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.