श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच 4-जी सेवा सुरू होणार आहे. पुढील आठवड्यात 4-जी सेवा जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होईल. मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुसार हा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रदेशातील 4-जी सेवा थांबविण्यात आली होती. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाची हाय-स्पीड इंटरनेटवरील बंदी 6 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे.
म्हणून इंटरनेट सेवा बंद केली-
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हे 5 ऑगस्टला रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मोदी सरकारने ठेवलेला हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आणि त्यानंतर तो दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. जम्मू-काश्मीर विभाजनाचा प्रस्ताव संसदेत ठेवण्याच्या एक दिवसआधी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी जम्मूमधील मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणीही होत आहे. पुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरु असताना परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून इंटरनेट सेवेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.