मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या पद्धतीने प्रचाराला सुरूवात केली आहे. या लोकसभा निवडणूकीत अनेक कलाकारही निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे नेहमी सामान्यांपासून पळ काढणारे हे कलाकार आता स्वतःच सामान्यांच्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधताना आणि त्यांच्या समस्या समजून घेताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ड्रीम गर्ल हेमा मालिनींनी मथुरेतील एका शेतात जाऊन तेथील शेतकऱ्यांना गव्हाची कापणी करण्यास मदत केली होती. आता यापाठोपाठ हेमा मालिनी गोवर्धनमधील एका शेतात जाऊन ट्रॅक्टरच्या सवारीचा आनंद लुटताना दिसल्या. ट्रॅक्टरवरील त्यांचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
BJP MP and Mathura candidate Hema Malini drives a tractor in Govardhan pic.twitter.com/ZPmiRLB1qA
— ANI UP (@ANINewsUP) April 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BJP MP and Mathura candidate Hema Malini drives a tractor in Govardhan pic.twitter.com/ZPmiRLB1qA
— ANI UP (@ANINewsUP) April 5, 2019BJP MP and Mathura candidate Hema Malini drives a tractor in Govardhan pic.twitter.com/ZPmiRLB1qA
— ANI UP (@ANINewsUP) April 5, 2019
हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. आता सामान्यांची मनं जिंकण्यासाठी चाललेले त्यांचे हे प्रयत्न फळाला येतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.