अहमदाबाद - लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी इतर नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन पटेल यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या राहत्या घरी टीव्हीवर हा सोहळा पहिला.
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्याला देश-विदेशातील नेत्यांना तसेच बॉलीवूडमधील दिग्गजांना आमंत्रीत करण्यात आले आहे. मात्र, मोदींच्या आई या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या राहत्या घरी टीव्हीवर हा सोहळा पाहिला. यावेळी मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी टाळ्याही वाजवल्या.