चेन्नई - ईशान्य मान्सूनमुळे भारताच्या दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चेन्नईच्या बर्याच भागात ढगांच्या गडगडाटासह, विजांचा कडकडाट व मुसळधार पावसाने झोडपले.
हेही वाचा - शाहजहांपूर : एलपीजी सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागून महिलेचा मृत्यू
कित्येक तास पाऊस सुरू राहिला त्यानंतर अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. बुधवारी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ईशान्य मान्सून तमिळनाडू आणि केरळसह देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार हजेरी लावेल असे सांगितले होते.
हवामान खात्याने गुरुवारी चेन्नईत ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
हेही वाचा - वेदनादायी.. बंगळुरूत पावसाच्या हाहाकारानंतर 'या' महिलेवर मुलांसह सार्वजनिक शौचालयात राहण्याची वेळ