तिरुअनंतपुरम - गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये पुन्हा हाहाकार माजला असून, पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक वर्दळीचे असलेल्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुराचे पाणी आल्यामुळे येत्या रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केरळमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने राज्यात पूर आला आहे. पुराचे पाणी विमानतळावर साचले आहे. पूरामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. पुरामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत कार्य सुरु आहे.