ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधव प्रकरण : पाककडून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन, भारताचा दावा - hearing

पाकिस्तान यावर १९ फेब्रुवारीला आपला पक्ष मांडणार आहे. यावर २० फेब्रुवारीला भारताकडून उत्तर देण्यात येईल. याप्रकरणी आगामी काही महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

कूलभूषण जाधव, हरिष साळवे
author img

By

Published : Feb 18, 2019, 5:10 PM IST

नवी दिल्ली / हेग - आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आज कुलभूषण जाधव प्रकरणात आपली बाजू मांडत आहे. याप्रकरणी ४ दिवस सुनावणी चालणार आहे. भारतातर्फे हरिष साळवे बाजू मांडत आहेत. याप्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.

पाकिस्तान दुष्प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा वापर करत असल्याचेही साळवे म्हणाले. पाकिस्तान यावर १९ फेब्रुवारीला आपला पक्ष मांडणार आहे. यावर २० फेब्रुवारीला भारताकडून उत्तर देण्यात येईल. याप्रकरणी आगामी काही महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

kulbhushan jadhav & Harish Salwe
कूलभूषण जाधव, हरिष साळवे
undefined

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने मार्च २०१६ मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तसेच, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच, कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.

पाकिस्तानी लष्कराने कुलभूषण यांना बलुचिस्तान प्रांतात पकडल्याचा दावा पाकने केला होता. तसेच, कुलभूषण इराणमार्गे पाकिस्तानात घुसल्याचा बनाव रचला होता. भक्कम पुरावे असल्याची बतावणी करत पाकिस्तानी मिलिटरी न्यायालयाने कुलभूषण यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय एकतर्फी फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. यामुळेच कुलभूषण यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणली होती. तसेच, पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते.

Intro:Body:

कुलभूषण जाधव प्रकरण : पाककडून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन, भारताचा दावा  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.