ETV Bharat / bharat

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक; कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा - देशातील कोरोना रुग्ण संख्या

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळाची बैठक झाली. 10 लाख 57 हजार 806 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

मंत्रिमंडळाची बैठक
मंत्रिमंडळाची बैठक
author img

By

Published : Jul 31, 2020, 3:18 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी, आदी मंत्री उपस्थित होते. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

मागील 24 तासांमध्ये देशात 55 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आता 16 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे, तर 10 लाख 57 हजार 806 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगतिले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 38 हजार 870 इतकी झाली आहे, तर गेल्या 24 तासांत 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 35 हजार 747 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर 2.23 टक्के इतका आहे. १९ जूनला देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता, तर रुग्ण बरे होण्याचा दर 64.54 इतका आहे. तसेच भारतात 1 कोटी 88 लाख 32 हजार 970 अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर गुरुवारी एकाच दिवसात 6 लाख 42 हजार 588 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.