ETV Bharat / bharat

पंतप्रधान देशातील कामगारांबाबत असंवेदनशील; काँग्रेसची टीका

'आपल्या भाषणातून देशातील माध्यमांना वृत छापण्यासाठी हेडलाईन दिली. मात्र, प्रवासी कामगारांसाठी कोणतीही हेल्पलाईन दिली नाही. तुमची राष्ट्र निर्मात्या कामगारांप्रती असलेली असंवेदनशीलता पाहून निराश आहोत, असे रणदीप सुरजेवाला यांनी टि्वट केले आहे.

Congress
Congress
author img

By

Published : May 13, 2020, 12:41 PM IST

Updated : May 13, 2020, 2:28 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण भारत अभियानासाठी २० लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'आपल्या भाषणातून देशातील माध्यमांना वृत छापण्यासाठी हेडलाईन दिली. मात्र, प्रवासी कामगारांसाठी कोणतीही हेल्पलाईन दिली नाही. तुमची राष्ट्र निर्मात्या कामगारांप्रती असलेली असंवेदनशीलता पाहून निराश आहोत, असे रणदीप सुरजेवाला यांनी टि्वट केले आहे.

  • 1/2
    Dear PM,

    What you said today gives the country and the media a HEADLINE.

    When the “blank page” is filled with “Heartfelt Help of People”, the Nation & Congress Party will respond.

    — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज आपल्या भाषणातून तुम्ही देशातील माध्यमांना हेडलाईन दिली. मात्र, देश हा मदतीच्या हेल्पलाईनची वाट पाहत आहे. तुम्ही जाहीर केलेलं हे पॅकेज आश्वासनापासून वास्तविकतेपर्यंतचा प्रवास पूर्ण करून सत्यात उतरेल, याची वाट पाहात आहोत, असे सुरजेवाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

आर्थिक मदत आणि सुरक्षितपणे घरी पोहचणे ही स्थलांतरित कामगारांची पहिली गरज आहे. याबाबत तुम्ही घोषणा कराल, अशी आशा होती. हालअपेष्टा सहन करत राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांप्रति असलेली असंवेदनशीलता पाहून निराश आहोत, असेही सुरजेवाला म्हणाले.

  • 2/2
    Dear PM,

    The mammoth heart breaking human tragedy of migrant workers walking back home needed compassion, care & safe return.

    India is deeply disappointed by your utter lack of empathy, sensitivity & failure to address the woes of millions of #MigrantWorkers !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. हे विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. तसेच स्वावलंबी भारताला एक नवी गती देणार असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. आर्थिक पॅकेजशी निगडीत संपूर्ण माहिती अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येणाऱ्या काही दिवसांत देणार आहेत.

Last Updated : May 13, 2020, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.