ETV Bharat / bharat

हरियाणा विधानसभा : निवडणूक काळात कोट्यवधींची दारू, रोकड अन् नशेचे पदार्थ जप्त

आत्तापर्यंत हरियाणा पोलिसांनी ६ कोटींपेक्षा जास्त रकमेचा मद्यसाठा जप्त केला आहे. तर ६ कोटी २ लाख रक्कम आचारसंहीता काळात जप्त करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 20, 2019, 8:24 AM IST

चंदीगड - विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हरियाणा पोलिसांनी तब्बल १ कोटी ३३ लाखांची रक्कम जप्त कली आहे. पोलीस तपासणीदरम्यान गुरुग्रामध्ये एका गाडीमधून रक्कम जप्त करण्यात आली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. निवडणूक काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, ड्रग्ज आणि चांदी जप्त करण्यात आली.

पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाचे पथक अवैध वाहतूकीवर बारीक लक्ष ठेवून होते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रलोभने दाखवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक तपास नाक्यांवर रोकड आणि मतदारांना प्रलोभन म्हणून देण्यात येणाऱ्या विविध वस्तू जप्त करण्यात आल्या.

हेही वाचा - गुरु नानक पवित्र स्थळाकडे आता दुर्बीणीतून पाहायची गरज नाही - मोदी

आत्तापर्यंत हरियाणा पोलिसांनी ६ कोटींपेक्षा जास्त रकमेचा मद्यसाठा जप्त केला आहे. तर ६ कोटी २ लाख रक्कम आचारसंहीता काळात जप्त करण्यात आली आहे. यासह ४ लाख किमतीचे चांदी जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी आत्तपर्यंत २५४ शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. निवडणूक काळात राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखत समाजविघातक घटकांवर नजर ठेवण्यासाठी ४८२ तपास नाके निर्माण करण्यात आले आहेत. उद्या २१ ऑक्टोबरला राज्यामध्ये मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी आहे.

हेही वाचा - हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गळा चिरून हत्या

Intro:Body:

national news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.