ETV Bharat / bharat

गुजरात: किडनी विकून शिक्षकाने फेडले कर्ज; छळ करणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा दाखल - Money lenders harassment news

सर्वाधिक किंमत देणाऱ्या व्यक्तीला किडनी देवू, अशी पुरोहित यांनी समाज माध्यमात जाहिरात दिली. श्रीलंकेच्या एका डॉक्टरने किडनी खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर पुरोहित यांनी श्रीलंकेत जावून 15 लाखा रुपयांना किडनी विकली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 17, 2020, 5:22 PM IST

अहमदाबाद- खासगी सावकाराच्या छळवणुकीचा भयंकर प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. शिक्षकाने किडनी विकून खासगी सावकाराचे कर्ज फेडले. तरीही सावकाराने आणखी पैसे मिळण्यासाठी शिक्षकाकडे तगादा लावला. अखेर पीडित शिक्षकाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर सावकार व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. राजाभाई पुरोहित असे पीडित शिक्षकाचे नाव आहे.

थाराड जिल्हयातील खोडा गावात राजाभाई पुरोहित हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी खासगी सावकाराकडून 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. एका वर्षानंतर कर्जाची रक्कम व व्याज हे दुप्पट झाले. हे कर्ज फेडण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षकाने किडनी विकण्याचा निर्णय घेतला.

सर्वाधिक किंमत देणाऱ्या व्यक्तीला किडनी देवू, अशी पुरोहित यांनी समाज माध्यमात जाहिरात दिली. श्रीलंकेच्या एका डॉक्टरने किडनी खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर पुरोहित यांनी श्रीलंकेत जावून 15 लाख रुपयांना किडनी विकली. त्यानंतर पीडित शिक्षकाने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची मुद्दलासह व्याजाची परतफेड केली.

मात्र, सावकाराने त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी करत पीडित शिक्षकाला त्रास देण्यास सुरुवात केली. अत्यंत मानसिक त्रास होत असल्याने शिक्षकाने थराड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी हर्षद वजीर, देवा राबरी, ओखा राबरी आणि वाश्रम राबरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुरोहित हे खरेच श्रीलंकेला गेले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. पुरोहित यांच्या किडनी काढली आहे का, याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, खासगी सावकाराकडून कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारल्याच्या अनेक घटना यापूर्वी गुजरातमध्ये समोर आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.