ETV Bharat / bharat

मॉरिशियस : 'ध्रुव'ने तेल गळती झालेल्या जहाजामधून 600 जणांची केली सुटका

जपानच्या मालकीच्या जहाजामधून मॉरिशियसजवळील समुद्रात सुमारे 1 हजार टनाची तेल गळती झाली होती. या एम. व्ही. वाकासिओ जहाजामधून 600 जणांची सुखरुपणे सुटका करण्यात आली आहे.

author img

By

Published : Aug 18, 2020, 1:23 PM IST

ध्रुवकडून मॉरिशियसमध्ये मदतकार्य
ध्रुवकडून मॉरिशियसमध्ये मदतकार्य

बंगळुरू – ध्रुव हेलिकॉप्टरने मॉरिशियसमधील तेल गळतीच्या घटनेत मदतकार्य करण्यासाठी मोलाची कामगिरी केल्याचे एचएएलचे संचालक आर. माधवन यांनी सांगितले. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) कंपनीने प्रगत कमी वजनाचे स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि चेतक विकसित केले आहे.

ध्रुव आणि चेतकने पुन्हा एकदा स्वदेशी तंत्रज्ञान सिद्ध करून दाखविले आहे. यापूर्वी या हेलिकॉप्टरचा शोध आणि मदतकार्यात मोठा वापर झाल्याची माहिती एचएएलचे संचालक आर. माधवन यांनी दिली.

जपानच्या मालकीच्या जहाजामधून मॉरिशियसजवळील समुद्रात सुमारे 1 हजार टनाची तेल गळती झाली होती. या एम. व्ही. वाकासिओ जहाजामधून 600 जणांची सुखरुपणे सुटका करण्यात आली आहे. त्याबद्दल भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, मॉरिशियस पोलीस यांचे माधवन यांनी आभार मानले आहेत.

जहाजातून समुद्रात तेल गळती झाल्याने ब्लू बे या संरक्षित सागरी क्षेत्राला आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हा जलमार्ग आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मॉरिशियसने पर्यावरणाची आणीबाणी जाहीर केली आहे. तेलाच्या गळतीचा पर्यटकांकडून भेट देण्यात येणाऱ्या सागरी किनाऱ्यावर मोठा दुष्परिणाम होणार आहे. तसेज जैवविविधता आणि समुद्रातील वनस्पतीसह संपूर्ण सागरी पर्यावरणावर परिणाम होणार आहे.

भारतीय सैन्यदल आणिन नागरी सेवेसाठी एचएएलने ध्रुवची संपूर्णपणे संरचना आणि विकास केला आहे. या ध्रुव हेलकॉप्टरचा वापर हा व्हिआयपीचा प्रवास, शोध व मदतकार्य, आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा कामात करण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.