ETV Bharat / bharat

गुजरातेत पोलिसांवर दगडफेकप्रकरणी ६८ जणांना अटक

author img

By

Published : May 17, 2020, 4:20 PM IST

शहरातील इतर कंटनेमेंट झोनमधील बॅरिकेड्स हटवले असतानाही केवळ आमच्याच परिसरातील बॅरिकेड्स न हटवल्याने ते नाराज होते, अशी माहिती पोलीस अधिकारी व्ही. के. गढवी यांनी दिली.

गुजरातेत पोलिसांवर दगडफेकप्रकरणी ६८ जणांना अटक
गुजरातेत पोलिसांवर दगडफेकप्रकरणी ६८ जणांना अटक

गांधीनगर - गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. परिसरातील बॅरिकेड्स हटवताना पोलिसांनी अडवल्यामुळे संतप्त जमावाने दगडफेक केली. याप्रकरणी ६८ लोकांना अटक करण्यात आली आहे. राजकोटच्या जंगलेश्वर परिसरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार केला.

बॅरिकेड्स न हटवल्याने स्थानिक नाराज होते. शहरातील इतर कंटनेमेंट झोनमधील बॅरिकेड्स हटवले असतानाही केवळ आमच्याच परिसरातील बॅरिकेड्स न हटवल्याने ते नाराज होते, अशी माहिती पोलीस अधिकारी व्ही.के.गढवी यांनी दिली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याचेही गढवी म्हणाले. दरम्यान, परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.