ETV Bharat / bharat

चीनी मालाची आयात रोखण्यासाठी विविध उत्पादनांची माहिती जमा करण्यास सरकारची सुरुवात - सुत्र - भारत चीन सीमा वाद

भारत चीन सीमा वादानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी देशभरातून होत आहे. अनेक संघटनांनी अभियानही राबविले आहे. भारत एकूण आयातील 14 टक्के माल चीनकडून आयात करतो.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 21, 2020, 9:34 PM IST

नवी दिल्ली - परदेशातून स्वस्तात आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंची माहिती जमा करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. याबरोबरच आयात केलेल्या मालाची स्थानिक वस्तूंशी तुलना, टॅक्स संबंधी माहिती सरकारने जमा करण्यास सुरुवात केली आहे. कमी दर्जाच्या आयात वस्तूंवर विशेषत चीनी मालावर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्थानिक निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी हा डेटा जमा करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आणि चीनी आयात कमी करण्यासाठी नुकतेच पंतप्रधान कार्यालयात एक बैठक झाल्याची माहितीही सुत्रांनी दिला आहे. चीनकडून आयात केल्याजाणाऱ्या वस्तूंबाबत मते आणि प्रतिक्रिया पाठविण्यास सरकारने उद्योगांना सांगितले आहे. हातात घालायची आणि भींतीवरील घड्याळे, काच, हेअर शाम्पू, मेकअपचे साहित्य, छपाईसाठीची शाई, वारनिश आणि तंबाखुजन्य उत्पादांनांची माहिती सरकारने मागितली आहे, असे सुत्रांनी सांगितले.

2014-15 ते 2018-19 या काळातली आयाती संदर्भातील माहिती. या वस्तूंची स्थानिक बाजारातील किंमत, स्थानिक उत्पादनाची क्षमता, फ्री ट्रेड करार, कर माहिती सरकारकडून संकलित करण्यात येत आहे. ही सर्व माहिती जमा करून इंडस्ट्री आणि कॉमर्स मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

भारत चीन सीमा वादानंतर चीनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणीही देशभरातून होत आहे. अनेक संघटनांनी अभियानही राबविले आहे. भारत एकूण आयातील 14 टक्के माल चीनकडून आयात करतो. यामध्ये मोबाईल, इलेट्रिक उत्पादने, टेलिकॉम, प्लास्टिक उत्पादने, फार्मा क्षेत्रासाठी लागणारा माल जास्त आयात करतो.

एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात भारताने चीनकडून 63.4 कोटी डॉलर मालाची आयात केली तर भारताने चीनला फक्त 15.5 कोटी डॉलर किमतीच्या मालाची निर्यात केली. दोन्ही देशांमधील आयात निर्यातीतील तफावत स्पष्ट दिसून येते. त्यामुळे मोदी सरकारकडून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्थानिक उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.