नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच एनआयटीमधील प्रवेशासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन नियमावलीनुसार, एनआयटीमध्ये प्रवेशासाठी आता १२वीला कमीत कमी ७५ टक्के मार्क असणे आवश्यक आहे. यासोबतच, जेईई मेन्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सेंट्रल सीट अलॉकेशन बोर्ड (सीएसएबी)ने एनआयटी आणि केंद्र सरकारचे अनुदान मिळणाऱ्या इतर तांत्रिक संस्थांच्या प्रवेशासाठी असणाऱ्या अटी शिथिल केल्या आहेत. पोखरियाल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
दरम्यान, कोरोनामुळे जेईई मेन्स प्रवेश परीक्षा दोनवेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता १ ते ६ सप्टेंबरदरम्यान या परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : तामिळनाडू; पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा रद्द...