ETV Bharat / bharat

'शेतकरी आंदोलनाचा सरकारवर दबाव, किमान आधारभूत किमतीवर सकारात्मक चर्चा'

विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता ५ तारखेला अंतिम तोडगा निघावा, अशी आशा आहे. सुमारे ७ तास बैठक चालली. मात्र, उशीर झाल्याने बैठक आटोपती घेतली. किमान आधाभूत किमतींबाबत सरकार मवाळ होत असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

शेतकरी नेते
शेतकरी नेते
author img

By

Published : Dec 3, 2020, 8:44 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू असलेली शेतकरी आणि कृषीमंत्र्यांची बैठक संपली असून अद्यापही बैठकीत अंतिम तोडगा निघालेला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. मात्र, बैठक सकारात्मक झाली असून आणखी बरीच चर्चा राहिल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. किमान आधारभूत किमतींना हात लावू नये, ही एक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार मवाळ होत असल्याचेही नेत्यांनी सांगितले.

काय म्हणाले शेतकरी नेते

विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता ५ तारखेला अंतिम तोडगा निघावा, अशी आशा आहे. सुमारे ७ तास बैठक चालली. मात्र, उशीर झाल्याने बैठक आटोपती घेतली. किमान आधाभूत किमतींबाबत सरकार मवाळ होत असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. चर्चा आणखी लांबण्याची शक्यता बैठकीत सहभागी झालेल्या एका नेत्याने व्यक्त केली.

बैठक पूर्णत: निष्फळ झाली नसून सकारात्मक चर्चा झाली. दुपारपर्यंत काहीही तोडगा निघाला नव्हता. चर्चा फिसकटेल असे वाटत होते. मात्र, दुपारनंतर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. एमएसपी शाबूत ठेवण्यास सरकार तयार आहे. मात्र, आधी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करावेत ही आमची मागणी आहे. आता पुढील बैठक ५ तारखेला होणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

३५ शेतकरी संघटनांशी सरकारची चर्चा

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज ३५ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. दिल्लीतील विज्ञान भवनात ही चर्चा झाली. दुपारी जेवणाच्या वेळी शेतकऱ्यांनी सरकारने देऊ केलेले जेवणही घेतले नाही. आपल्याबरोबर आणलेले जेवण नेत्यांनी केले. तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.