ETV Bharat / bharat

वाईन कारखान्यात तयार होतयं सॅनिटायझर... राजस्थान सरकाचा उपक्रम - कोरोना व्हायरस बातमी

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करावा असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे राजस्थान सरकारने शासकीय गंगानगर साखर कारखान्यातील अल्कोहोलचे उत्पादन बंद करुन सॅनिटायझर बनविण्याचे काम हाती घेतले आहे. यातून तयार झालेले सॅनिटायझर ग्राहकांना अवघ्या 50 रुपयात मिळत आहे.

goverment-producing-senetizer-from-wine-factories
वाईन कारखान्यामधून सॅनिटायझरचे उत्पन्न...
author img

By

Published : Apr 3, 2020, 1:36 PM IST

जयपूर- जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. देशातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हात साबणाने, सॅनिटायझरने धुवावे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अचानक बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. काही दुकानदारांनी साठवणूक करुन संधीचा फायदा घेतला. त्यामुळे राजस्थान सरकारने परिस्थिती लक्षात घेता 23 मार्च रोजी गंगानगर साखर कारखान्यामार्फत सॅनिटायझर तयार करण्याची जबाबदारी घेतली. याअंतर्गत दररोज 70 हजार ते एक लाख सॅनिटायझरच्या बाटल्यांचे उत्पादन केले जात आहे.

वाईन कारखान्यामधून सॅनिटायझरचे उत्पन्न...

हेही वाचा- जम्मू-काश्मीरमधील 4-G इंटरनेट सेवा सुरू करावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका..

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करावा असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे राजस्थान सरकारने शासकीय गंगानगर साखर कारखान्यातील अल्कोहोलचे उत्पादन बंद करुन सॅनिटायझर बनविण्याचे काम हाती घेतले आहे. यातून तयार झालेले सॅनिटायझर ग्राहकांना फक्त 50 रुपयात मिळत आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.