सॅनफ्रान्सिस्को - गुगलने स्टैनफोर्ड विद्यापीठासह मिळून वैश्विक कोविड-19 मॅप लॉन्च केले आहे. ज्यामुळे पत्रकारांना वाचकांसाठी आपल्या साइटवर कोरोना संबंधित ताजी माहिती देता येईल. या कोविड-19 ग्लोबल केस मॅपरमधून पत्रकारांना आपल्या क्षेत्रातील किंवा राष्ट्रीय आकडेवारी समजेल.
लोकसंख्येनुसार कोरोनाबाबत माहिती दर्शविण्यात येईल
गुगल न्यूज लॅबचे डेटा एडिटर सिमोन रोजर्स म्हणाले, "यात मागील 14 दिवसांतील लोकसंख्या व कोरोनाची आकडेवारी आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील लोकसंख्या व कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या यात दर्शविण्यात येईल. ज्यामुळे आपण जगातील कोणत्याही शहराशी आपल्या शहराची तुलना करता येईल.
या अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये अमेरिकेसह जगभरातील 176 देशांच्या आकडेवारींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 18 देशांसाठी राज्य आणि राज्यातील शहरांचा डेटाही अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
यामध्ये गुगलकडून ट्रान्सलेटरचीही सोय देण्यात येत आहे. त्यामुळे 80हून अधिक भाषांमध्ये जगभरातील कोरोनाची आकडेवारी आपल्याला समजू शकेल.
रॉजर्स यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) सांगितले होते की, पुढे यात देशनिहाय आकडेवारी जोडण्यात येणार आहे. ज्यामुळे पत्रकारांना कोणत्या देशात कोरोनाचा प्रसार झाला आहे, हे समजले सोपे होईल.