ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये असाही गोंधळ; लग्नाच्या परवानगीसाठी वधूकडून प्रयत्न

लग्नाच्या परवानगीसाठी ऑनलाईन आवेदन देता येते. मात्र, येथील एका वधू मुलीचे ऑनलाईन आवेदन ३ वेळा नाकारण्यात आले. यामुळेच वधू सरकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे.

author img

By

Published : Apr 23, 2020, 7:04 PM IST

देहरादून - कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे लग्नसमारंभासह सर्वच कार्यक्रम रद्द केले जात आहेत. काही लोक लग्नाची तारीख पुढे ढकलत आहेत, तर कोणी लग्न करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी भटकत आहेत. असाच काहीसा प्रकार देहरादून येथे समोर आला आहे. लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी येथे चक्क वधू मुलगी भटकत आहे.

लॉकडाऊनमध्ये असाही गोंधळ; लग्नाच्या परवानगीसाठी वधूकडून प्रयत्न

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे देहरादूनला रेड झोन घोषित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस आणि प्रशासन सतर्कता बाळगत आहे. देहरादूनमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन नियमांबाबत पोलीस कडक नियम पाळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी लोकांना परवानगी घ्यावी लागत आहे.

लग्नाच्या परवानगीसाठी ऑनलाईन आवेदन देता येते. मात्र, येथील एका वधू मुलीचे ऑनलाईन आवेदन ३ वेळा नाकारण्यात आले. यामुळेच वधू सरकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे.

२६ एप्रिलला माझे लग्न आहे. लग्नाला केवळ ३ दिवस बाकी आहेत. मात्र, अद्यापही लग्नासाठी परवानगी मिळालेली नाही. लग्नाची सर्व तयारी झालेली आहे. हॉल बूक झाला आहे. वर मुलाच्या घरच्यांनाही येण्यासाठी परवानगी मिळालेली आहे, असे भानियावाला येथे राहणाऱ्या वधू मुलीने सांगितले. वऱ्हाड टिहरी येथून येत आहे. मात्र, वधू अद्यापही परवानगीसाठी प्रयत्न करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.