नवी दिल्ली (गाझियाबाद) - गाझियाबादमधील एका शिक्षण संस्थेच्या संचालकाने राम मंदिरासाठी मोठा धनादेश दिला आहे. चक्क 2 कोटी 51 लाख 1 रुपयांचा चेक राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात आला आहे. गाझियाबाद येथील रहिवासी हर प्रसाद गुप्ता यांनी हा धनादेश दिला आहे.
5 कोटी रुपये जमा-
हर प्रसाद गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार ते लहानपणापासूनच राम मंदिर चळवळीशी संबंधित होते. आता जेव्हा ते डोळ्यासमोर राम मंदीर बांधताना पाहत आहेत. तेव्हा त्यांना कोणतीही कमतरता सोडायची इच्छा नाही. हर प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की 2 दिवसात आम्ही गाझियाबादहून सुमारे 5 कोटी रुपये जमा केले आहेत. पावतीव्दारे पैसे जमा करणे. पावतीमध्ये किमान दान 10 रुपये करता येते.
अधिकाधिक लोकांना राम मंदिर बांधण्यासाठी जोडले जावे-
राम मंदिरासाठी पैसे गोळा करणाऱ्या लोकांची इच्छा आहे की, अधिकाधिक लोकांना राम मंदिर बांधण्यासाठी जोडले जावे. म्हणूनच यासाठी 4000 संघ तयार केले गेले आहेत. हे जागो-जोगी जाऊन पावत्या फाडत आहेत. लोक श्रद्धेने रामाच्या चरणी श्रद्धा अर्पण करीत आहेत.
हेही वाचा- सरकारने नामांतराच्या वादात पडू नये, अन्यथा 'सरकार' पडेल - आठवले