नवी दिल्ली - काश्मीर प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही, ते एक छुपे युद्ध आहे. या मुद्यावर फार पूर्वीच योग्य पावले उचलायला हवी होती. एखाद्या घटनेच्या आधारावर सरकारच्या धोरणांच्या यशापयशाचे मुल्यमापन करू नका, असे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे.
MoS MEA VK Singh: This very same South Kashmir was very peaceful 2005-2012. What's the reason for the surge in incidents there after 2012. Have you analysed this? Why did this happen? (18.02.2019) https://t.co/S5NFnvk6hF
— ANI (@ANI) February 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">MoS MEA VK Singh: This very same South Kashmir was very peaceful 2005-2012. What's the reason for the surge in incidents there after 2012. Have you analysed this? Why did this happen? (18.02.2019) https://t.co/S5NFnvk6hF
— ANI (@ANI) February 19, 2019MoS MEA VK Singh: This very same South Kashmir was very peaceful 2005-2012. What's the reason for the surge in incidents there after 2012. Have you analysed this? Why did this happen? (18.02.2019) https://t.co/S5NFnvk6hF
— ANI (@ANI) February 19, 2019
भाजपच्या 'मन की बात मोदी के साथ' अभियानांतर्गत सिंह शिमला येथे पुलवामा दहशतवाद हल्ल्यासंदर्भात बोलत होते.
एक अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले, ती एक चकमक होती. याचा अर्थ स्थिती खराब आहे, असा होत नाही. २०१२ नंतर दक्षिणी काश्मिरातील परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. यापूर्वी दक्षिणी कश्मीरमधील परिस्थिती शांत होती. मात्र यानंतर खोऱ्यातील परिस्थिती बदलली, असेही व्ही. के. सिंह यांनी म्हटले होते.