चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी सार्वजनिक गणेशोत्सवावरील राज्य सरकारने लावलेली बंदी कायम ठेवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये केवळ घरगुती गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती एम. एम. सुरेश आणि आर. हेमलता यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला. राज्य सरकारने गणेशोत्सवांवर लागू केलेली बंदी उठवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्या होत्या. त्यावर निकाल देताना न्यायालयाने राज्य सरकारचा सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतचा निर्णय कायम ठेवला. तसेच, घरगुती गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे.
यापूर्वी, गुरुवारी उच्च न्यायालयाने सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना काही प्रमाणात सूट देण्यात येऊ शकते का? असे न्यायालयाने सरकारला विचारले होते. मात्र याबाबत कोणतीही सूट देऊ शकत नसल्याचे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केले होते.
हेही वाचा : कोरोनाच्या सावटाखाली मुंबई-पुण्यात 'अशा' पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव