अमरावती - स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधींनी देशभर भ्रमण केले. दक्षिणेकडे जेव्हा स्वतंत्रता आंदोलन जोर धरत होते, तेव्हा 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली. दुग्गीराला गोपालकृष्णय्या, ज्यांना 'आंध्र रत्न' म्हणून देखील ओळखले जाते; त्यांनी या चिराला-पिराला आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
गांधी १५० : चिराला-पिराला आंदोलन, आणि गांधीजींची तुटलेली काठी... - दुग्गीराला गोपालकृष्णय्या
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी 'सारस्वत निकेतन ग्रंथालया'च्या नव्या इमारतीची पायाभरणी केली. या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये, गांधीजींची काठी तुटली. आजपर्यंत ती तुटलेली काठी ग्रंथालयामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे.
अमरावती - स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधींनी देशभर भ्रमण केले. दक्षिणेकडे जेव्हा स्वतंत्रता आंदोलन जोर धरत होते, तेव्हा 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली. दुग्गीराला गोपालकृष्णय्या, ज्यांना 'आंध्र रत्न' म्हणून देखील ओळखले जाते; त्यांनी या चिराला-पिराला आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
स्वातंत्र्यलढ्यादरम्यान 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती.
गांधी १५० : चिराला-पिराला आंदोलन, आणि गांधीजींची तुटलेली काठी...
अमरावती - स्वातंत्र्यलढ्यादरम्यान महात्मा गांधींनी देशभर भ्रमण केले. दक्षिणेकडे जेव्हा स्वतंत्रता आंदोलन जोर धरत होते, तेव्हा 'चिराला-पिराला' आंदोलनाच्या निमित्ताने गांधीजींनी आंध्र प्रदेशला भेट दिली. दुग्गीराला गोपालकृष्णय्या, ज्यांना 'आंध्र रत्न' म्हणून देखील ओळखले जाते; त्यांनी या चिराला-पिराला आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
१९२९ मध्ये, जेव्हा महात्मा गांधींना या कर-विरोधी सत्याग्रहाबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी चिराला शिवमंदीरात बैठक आयोजित केली. या बैठकीला हजारो लोकदेखील उपस्थित होते. कालांतराने याच ठिकाणी गांधीजींचा पुतळा उभा केला गेला.
१९२९ मध्येच गांधीजींनी याठिकाणी 'सारस्वत निकेतन ग्रंथालया'च्या नव्या इमारतीची पायाभरणी केली. हे ग्रंथालय भारतातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे. 'व्ही. व्ही. श्रेष्ठी' यांनी १९१८ मध्ये या ग्रंथालयाची स्थापना केली होती.
या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये, गांधीजींची काठी तुटली. आजपर्यंत ती तुटलेली काठी ग्रंथालयामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे.
सारस्वत निकेतन ग्रंथालय आंध्र प्रदेशातील मुख्य संशोधन-आधारित ग्रंथालयांपैकी एक आहे. या ग्रंथालयाच्या संग्रहात 'पाम लीफ हस्तलिखितां'च्या दुर्मिळ संग्रहासह ७० हजारांहून अधिक पुस्तके आहेत.
हेही पहा :
Conclusion: