नवी दिल्ली - देशात कोरोनाचे रुग्णाचे प्रमाण वाढतच चालले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, मणिपूर हे कोरोनामुक्त झाले होते. मात्र, इंफाळमध्ये पुन्हा एक 31 वर्षीय तरूण कोरोनाबाधित आढळला आहे. मणिपूरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यानी माहिती दिली.
नुकताच आपल्या कर्करोगग्रस्त वडिलांसोबत मुंबईहून परतलेल्या इंफाळपूर्व जिल्ह्यातील 31 वर्षीय तरूणाची गुरुवारी सकारात्मक चाचणी आली आहे. रुग्णावर इंफाळ येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्था (जेएनआयएमएस) च्या ट्रीटमेंट ब्लॉक आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.