चंदीगड - देशात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढवण्यात आले. मात्र, यामध्येही केंद्र सरकार उज्ज्वला योजनेमधून गरिबांना घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करत आहे. ही सेवा तीन महिन्यापर्यंत मोफत देण्यात येणार आहे. आतापर्यंत मानसा जिल्ह्यातील अनेक लोकांना या योजनेचा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्याकडे उज्जवला योजनेमधील लाभार्थ्यांची यादी आहे. त्याची गावानुसार यादी केली आहे. त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना घरपोच मोफत सिलिंडर देत असल्याचे गॅस एजेन्सीच्या मालक अरुण कुमार यांनी सांगितले. तसेच या योजनेमधील लाभार्थ्यांना फॉर्म पाहिजे असल्यास सर्व फॉर्म गॅस ऐजन्सीच्या मालकाजवळ उपलब्ध असल्याचे जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी मधू यांनी सांगितले. तसेच अनेकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचेही लोकांनी सांगितले.