नवी दिल्ली - यंदाच्या रक्षाबंधन उत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. रक्षाबंधनाच्या उत्सवासाठी उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामडंळाने (यूपीएसआरटीसी) सर्व श्रेणीतील बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास जाहीर केला आहे.
शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी जाहीर केलेला महिलांसाठीचा मोफत बस प्रवास हा 2 ऑगस्ट मध्यरात्रीपासून ते 3 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे. तसेच रक्षाबंधन उत्सवासाठी राज्यातील राखी विक्रेते दुकानं आणि मिठाई दुकाने सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, काही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. कोरोना संकटकाळात 3 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून व्यवसायिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. अॅनलॉक झाल्यानंतर बाजारपेठ हळुहळु सुरू झाली असून रक्षाबंधन उत्सवासाठी नानाविध राख्या बाजारपेठेत आल्या आहेत. कोरोनी भिती असूनही महिला भाऊरायांसाठी आकर्षक, सुंदर आणि सुबक राखी खरेदीसाठी बाजारात फिरताना दिसत आहेत.