ETV Bharat / bharat

काश्मीर प्रश्न द्विपक्षीयच, तिसऱ्याने मध्यस्थी करण्याची गरज नाही -  फ्रान्स अध्यक्ष - भारत आणि पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान दोघांनी काश्मीर वाद चर्चेद्वारे सोडवावा. या प्रश्नात तिसऱ्या कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.

फ्रान्स अध्यक्ष आणि मोदी
author img

By

Published : Aug 23, 2019, 9:16 AM IST

Updated : Aug 23, 2019, 9:34 AM IST

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान दोघांनी काश्मीर वाद चर्चेद्वारे सोडवावा. या प्रश्नात तिसऱ्या कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इमॅन्युल मॅक्रॉन बोलत होते. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

  • France President Emmanuel Macron in Chantilly: PM Modi told me everything about Kashmir & the situation in J&K. I said Pakistan & India will have to find a solution together & no third party should interfere or incite violence. pic.twitter.com/RmjEy7VIX8

    — ANI (@ANI) August 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदी काल (गुरुवारी) दोन दिवसीय फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. मोदी आणि मॅक्रोन पॅरिसपासून ६० किमी लांब असेलल्या चँन्टीली येथे भेटले. यावेळी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

भारत पाकिस्तान प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सोडवण्यात यावा, असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही करणार असल्याचे मॅक्रॉन यांनी सांगितले. काश्मीर मुद्द्यावर मी मोदींशी चर्चा केली. काश्मीर प्रश्नावरून भारत पाकिस्तानचे हिंसेचा मार्ग अवलंबू नये, प्रादेशिक स्थिरता बाळगावी. तसेच लोकांच्या हक्कांवर गदा न आणण्याचे आवाहन मॅक्रॉन यांनी केले. मात्र, यावेळी मोदींनी बोलताना काश्मीरचा उल्लेख टाळला. दहशतवादावर आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद घेण्याच्या मोदींच्या कल्पनेला मॅक्रोन यांनी पाठिंबा दिला.

अफगानिस्तानमध्ये नियमित निवडणुका घेण्याच्या भारताच्या मताला मॅक्रॉन यांनी पाठिंबा दिला. तसेच अफगाणिस्तानमधील दहशतवादी अड्डे संपवण्यासासह माणवी हक्क जपण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर दोघांचे एकमत झाले.

यावेळी भारत पाकिस्तानमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल टेक्नॉलॉजीवर चर्चा झाली. जैतापूरमध्ये ६ न्युक्लीअर रिअॅक्टर बांधण्याबाबतही चर्चा झाली. सागरी सुरक्षेसाठी 'स्पेस टेक्नॉलॉजीच्या' क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एक अभियान आखण्यात आले आहे. याचा उपयोग इंडो पॅसिफिक क्षेत्राला होणार आहे. भारत २०२२ साली अवकाशामध्ये मानवरहित यान पाठवणार आहे. त्यासाठी वैद्यकिय पथकाला प्रशिक्षण देण्याचे काम फ्रान्स करणार आहे.

फ्रान्सकडून भारताला ३६ राफेल विमान करारांतर्गत पहिले विमान यावर्षी मिळणार आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबधित अडचणींवरही चर्चा करण्यात आली. लवकरच दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने उच्चस्तरीय चर्चा करण्यात येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.