ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश; चंदौली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीने उडवले, चौघांचा मृत्यू

कोतवाली क्षेत्रातील हिनौता गावाजवळून रेल्वेची डाऊनलाईन जाते. तेथील डीडीयू जंक्शनवरून चंदौलीकडे ही मालगाडी मंगळवारी रात्री जात होती.

train faccident
चंदौली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीने उडवले
author img

By

Published : May 27, 2020, 8:33 AM IST

चंदौली(उत्तर प्रदेश) - येथील डीडीयू-गया या रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री मालगाडीने चार जणांना उडवले. या अपघातात चारही जणांचा मृत्यू झाला असून त्यांची अजून ओळख पटली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे डीआरएम आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चंदौली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीने उडवले, चौघांचा मृत्यू

कोतवाली क्षेत्रातील हिनौता गावाजवळून रेल्वेची डाऊनलाईन जाते. तेथील डीडीयू जंक्शनवरून चंदौलीकडे ही मालगाडी मंगळवारी रात्री जात होती. यावेळी पोल संख्या 660/24 - 660/30 यामधील भागात या रेल्वे मालगाडीने काही लोकांना उडवले. या भीषण अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला असून त्यांची अजून ओळख पटली नाही. या घटनेची माहिती रेल्वेचालकाने ताबडतोब कंट्रोल रुमला दिली.

यानंतर रेल्वे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 18 व 12 वर्षीय दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.