नाडियाड - गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाड शहरात शुक्रवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये एका वर्षाच्या मुलीसह 4 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले आहेत. दरम्यान एनडीआरएफ टीमने ढिगाऱ्या खाली दबलेल्या 5 जणांना सुरक्षीत बाहेर काढले आहे.
जिल्ह्यातील प्रगतीनगर भागातील तीन मजली इमारत शुक्रवारी रात्री कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 9 जण अडकले होते. त्यातील 4 जण जागीच ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरक्षक दिव्या मिश्रा यांनी दिली. बचाव कार्य 7 तास चालले असून या कार्यात एनडीआरएफ टीमसह नाडियाड, वडोदरा, आनंद , अहमदाबाद येथील अग्निशमन दलाचे पथक आणि जिल्हा पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता.
कमरानभाई अन्सारी ( 45), अलिना (१), पूनमबेन सचदेव ( 45) आणि राजेश दर्जी (65) अशी मृतीची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुपार ते रात्री उशिरापर्यंत सतत पडणाऱ्या पावसामुळे या भागात पूर आला. त्यानंतर इमारतीच्या पायापर्यंत पाणी शिरल्याने ती कोसळल्याचं स्थानिकांनी सांगितले आहे.