भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तथाकथित 42 डॉक्टरांच्या 'दुकानां'ना (क्लिनिक) सील करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. तोतया डॉक्टरांविरोधात मोहीम राबवण्यात आली आहे.
अधिकृतपणे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तथाकथित डॉक्टरांविरूद्ध सर्वसमावेशक तपासणी मोहीम राबविली. लोकांवर उपचार करणाऱ्या मात्र, अधिकृत कागदपत्रे नसलेल्या संशयित डॉक्टरांच्या दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेमध्ये असे आढळले आहे की, असे बरेच डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडे डिग्री नाही आणि ते रुग्णांवर अॅलोपॅथी उपचार करत आहेत. यासह काही लोक असे आहेत, ज्यांच्यामार्फत पदवीविनाही दवाखाने चालविले जात होते. एवढेच नव्हे तर, दवाखाने चालवण्याच्या नियमांनुसार, या डॉक्टरांनी आरोग्य विभागाची परवानगीही घेतली नव्हती.
हेही वाचा - मध्य प्रदेश : उज्जैनमध्ये विषारी दारू पिऊन 7 जणांचा मृत्यू
अपर जिल्हाधिकारी आशिष वशिष्ठ म्हणाले की, महसूल अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांच्या संयुक्त कारवाईत जिल्ह्यातील अशा 42 हून अधिक डॉक्टरांच्या 'दुकानां'ना सीलबंद करण्यात आले असून तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिलेल्या सूचनांसह संबंधित कागदपत्रे सादर करण्याविषयी नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळत सादर न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वशिष्ठ यांनी सांगितले.
हेही वाचा - आखाती देशातील भारतीय मजुरांची जीवन-मृत्यूची झुंज, संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याची गरज