हैदराबाद- कोरोना विषाणूमुळे संसर्गित झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी संशोधकांनी तात्पुरत्या स्वरुपात एका औषधाचा वापर करता येईल, असे औषध शोधले आहे. ते औषधे कोरोना विषाणूला परिणामकाररित्या पेशींमध्ये जाण्यापासून रोखू शकते.
वॉशिंग्टन विद्यापीठाचा औषधनिर्माणशास्त्र विभाग मानसिक आजारांपासून वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रतिरोधक औषध फ्लुवोक्झामाइनचा वापर कोरोनाबाधित रुग्णावर करता येईल का यावर संशोधन करत आहे.
कोरोना विषाणूचा जास्त संसर्ग रोगप्रतिकार क्षमता कमी असणारे आणि ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना होत आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या संशोधकांच्या मतानुसार फ्लुवोक्झामाइनचा संबंध प्रथिनांशी येतो. प्रथिंनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मदत होते.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारावर आतापर्यंत कोणतिही मान्यताप्राप्त उपचारपध्दती विकसित झालेली नाही. यामुळे आरोग्य सेवेतील डॉक्टर्स यांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात अडचण येत आहे, असे संशोधकांचे मत आहे.
फ्लुवोक्झामाइनचा वापर कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना प्रतिरोधक म्हणून काम करु शकतो. मात्र, त्याची क्षमता मलेरियाचे औषध हायड्रोक्सिक्लोरोक्वीन पेक्षा कमी प्रतिरोधक आहे, असे मानसशास्त्राचे प्राध्यापक एरिक जे. लेंझे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संसर्गातील दोन टप्पे महत्वाचे आहेत. संसर्ग झाल्यामुळे व्यक्तिला ताप आणि सर्दीचा त्रास सुरु होतो. दुसऱ्या टप्प्यात जीवघेणी प्रतिक्रिया म्हणजेच वैद्यकिय भाषेत त्याला सायकोटीन स्ट्रॉम म्हटले जाते. या दुसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी फ्लुवोक्झामाइनचा वापर करता येऊ शकतो, संसर्ग आजारावरिल औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक कॅलिन मॅटर यांनी म्हटले आहे.