चंदीगड - हरियाणा राज्यातील अंबाला छावणी परिसरात भिंत कोसळल्याने ३ बालकांसह ५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री उशिरा घडली. घरामध्ये चित्रपट पाहत असताना अचानक १२ जणांवर भिंत कोसळली. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्यांवर भिंत कोसळून झालेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - जादुटोण्याच्या संशयावरुन ओरिसामध्ये सहा जणाचे काढले दात, मानवी विष्ठाही घातली खाऊ
झोपडीच्या शेजारीच एक बहुमजली वाहनतळ बांधण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. जवळच असलेल्या किंग पॅलेस या इमारतीच्या भिंतीमध्ये नाल्यातील पाणी शिरले होते. त्यामुळे ही भिंत कमकुवत झाली होती. भिंतीमध्ये भेगा पडल्याने ती अचानक कोसळली.
हेही वाचा - गायीच्या शेणापासून बनवले आंघोळीचे साबण, जाणून घ्या इतकी आहे किंमत
कशी कोसळली भितं
कुटुंबातील सर्वजण रात्री टीव्हीवर चित्रपट पाहत होते. त्यावेळी अचानकपणे टीव्हीचा सिग्नल गेल्याने एक व्यक्ती अँटिना नीट करण्यासाठी भिंतीच्या साहाय्याने छतावर चढला. भिंतीवरुन खाली उतरत असताना भिंत हलल्याने झोपडीवर कोसळली. यातील ७ लोकांना बाहेर पडण्यात यश आल्याने ते थोडक्याच बचावले, मात्र, ५ जणांचा ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला.