ETV Bharat / bharat

अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता पाच तरुण चीनमध्येच, लष्कराच्या हॉटलाइन संदेशाला चीनचं उत्तर - अरुणाचल प्रदेशातली बेपत्ता तरुण

हे पाचही तरुण अरुणाच प्रदेश राज्यातील सुबनसारी जिल्ह्यातील आहेत. जंगलात शिकारीला गेले असताना चिनी लष्कराने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याबरोबर शिकारीला गेलेल्या इतर दोन गावकऱ्यांनी याबाबतची माहिती तरुणांच्या कुटुंबीयांना दिली होती.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 8, 2020, 7:28 PM IST

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेश राज्यातून बेपत्ता झालेले पाच तरुण चीनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय लष्कराने हॉटलाइनवरून पाठवलेल्या संदेशाला चिनी सैन्याने उत्तर दिले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री आणि पूर्व अरूणाचल प्रदेशचे खासदार किरण रिजीजू यांनी याबाबत माहिती दिली. या पाच युवकांना भारताच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेवर चिनी प्रशासन काम करत असल्याचे रिजीजू म्हणाले आहेत.

किरण रिजीजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 'भारतीय लष्कराने पाठवलेल्या हॉटलाइन संदेशाला चिनी लष्कराने उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले पाच तरुण चीनच्या प्रदेशात आढळून आले आहेत. या पाच तरुणांना भारतात माघारी आणण्यासाठीच्या प्रक्रियेवर चिनी प्रशासन काम करत आहे, असे ट्विट रिजीजू यांनी केले. सिंगकूम, प्रसात रिंगलिंग, दोंगतू इबिया, तानू बाकेर आणि नागुरु दिरी अशी या पाच तरुणांची नावे आहेत.

  • China's PLA has responded to the hotline message sent by Indian Army. They have confirmed that the missing youths from Arunachal Pradesh have been found by their side. Further modalities to handover the persons to our authority is being worked out.

    — Kiren Rijiju (@KirenRijiju) September 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चिनी सैन्याने अपहरण केल्याचा आरोप

हे पाचही तरुण अरुणाचल प्रदेश राज्यातील सुबनसारी जिल्ह्यातील आहेत. जंगलात शिकारीला गेले असताना, चिनी सैन्याने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याबरोबर शिकारीला गेलेल्या इतर दोन गावकऱ्यांनी याबाबतची माहिती तरुणांच्या कुटुंबीयांना दिली होती. चिनी सैनिक त्यांना घेऊन गेल्याचे दोघांनी सांगितले होते. सुबनसारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तारु गुसार यांनी म्हटले होते की, चिनी सैनिकांनी पाच तरुणांचे अपहरण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.